Samsung चा तरुणांसाठी पुढाकार!
2021 मध्ये सुरू झालेला हा उपक्रम देशातील जलद वाढणाऱ्या संघटित रिटेल क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यास मोठी मदत करत आहे. आता सुरू झालेल्या ‘दोस्त सेल्स 4.0’ च्या माध्यमातून सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडिया (ESSCI) आणि टेलिकॉम सेक्टर स्किल्स कौन्सिल (TSSC) यांच्यासह कौशल्यविकास मोहिमेला अधिक बळ दिले आहे.
Govt Job: तरुणांनो, ही संधी गमावू नका! बँक ऑफ बडोदामध्ये 2700 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज
सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे सीएसआर आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स प्रमुख शुभम मुखर्जी यांनी सांगितले की, “सॅमसंग भारतीय तरुणांना देशाच्या विकासयात्रेत अर्थपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. या कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये आधुनिक रिटेल क्षेत्रात आवश्यक आत्मविश्वास आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित होत आहेत.”
ESSCI चे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी सांगितले की हा सहयोग भारतातील स्किलिंग इकोसिस्टमला बळकटी देतो आणि तरुणांना रोजगारासाठी मजबूत मार्ग उपलब्ध करून देतो.
TSSC चे सीईओ लेफ्टनंट जनरल के. एच. गवस (नि.) यांनी या उपक्रमाला डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी उच्च दर्जाचे रिटेल कौशल्य विकसित करणारा महत्वाचा टप्पा म्हटले.






