फोटो सौजन्य - सोशल मीडिया
School Statistics India 2026: शाळा हे विद्येचे माहेरघर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ? भारतीत या शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या जगातील अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे १५ लाख शाळा आहेत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व शाळा एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत. भारतातील शिक्षणाची ही पाठशाळा अनेक रंगांनी नटलेली आहे. नवोद्यची मुले जी उद्याची अधिकारी आहेत ती आता कडूलिंबाच्या झाडाखाली घडत आहेत, तर आज सैनिकी शाळेत देशाच्या सुरक्षेतेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जात आहेत. देशात सरकारी शाळांबरोबरच खाजगी शाळांचेही वेगळे विश्व आहे. नवीन शैक्षणिक धोरणानंतर शाळा आता केवळ ब्लॅकबोर्डपुरत्या मर्यादित राहिल्या नसून त्या कौशल्य विकासाचे (Skill Development) केंद्र बनत आहेत.
ताज्या सरकारी आकडेवारीनुसार, भारतात एकूण शाळांची संख्या सुमारे १४.७१ लाख ते १५.५ लाख दरम्यान आहे. ही संख्या देशाला जगातील सर्वात मोठ्या शालेय नेटवर्क असलेल्या देशांच्या रांगेत सर्वात पुढे आणते. या अवाढव्य जाळ्यात सुमारे २४.७ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी १ कोटींहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत.
आज भारतातील ६४.७% शाळांमध्ये कॉम्पुटर लॅबची सुविधा आहे. सुमारे ६३.५% शाळा या इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत. विजेची पोहोच आता ९३.६% शाळांपर्यंत झाली आहे, जी शिक्षण क्षेत्रातील एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.






