फोटो सौजन्य - सोशल मीडिया
उमेद्वाराची निवड थेट गुणवत्तेच्या (Merit List) आधारावर केली जाईल. या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेद्वारांनी ४ जून २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती रायपूर विभाग आणि वॅरन रिपेयर शॉपसाठी करण्यात येणार आहे.
या भरतीसाठी फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशिनिस्ट, कोपा, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, स्टेनोग्राफर यांसह अनेक ट्रेडचा समावेश आहे. यामध्ये रायपूर विभागासाठी १,३६३ पदे वॅगन रिपेअर शॉप (रायपूर) साठी २८१ पदे निश्चित पदे भरण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा: या भरतीमध्ये उमेद्वाराचे वय १५ ते २४ दरम्यान असावे. वयाची गणना ५ मे २०२६ या तारखेनुसार केली जाईल.
वयोमर्यादेत सूट: राखीव प्रवर्गातील उमेद्वारांना नियमानुसार सूट मिळेल. ज्यामध्ये SC/ST उमेद्वारांना ५ वर्ष आणि OBC उमेद्वारांना ३ वर्षाची सूट असेल.
निवड प्रक्रिया: उमेद्वाराची निवड १० वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीवर आधारित मेरिट लिस्टद्वारे केली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणी (Medical Test) घेतली जाईल.
अर्ज करण्यासाठी उमेद्वार Apprenticeship India Portal किंवा SECR च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. तेथे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करू शकतात.






