स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेची माहिती (फोटो सौजन्य - iStock)
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या फेज-१३ निवड पद भरती २०२५ मध्ये देशभरातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या भरतीसाठी आयोगाला एकूण २९,४०,१७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांमध्ये गट ‘ब’ (नॉन-राजपत्रित) आणि गट ‘क’ (नॉन-टेक्निकल) पदांसाठी ही भरती केली जात आहे.
यावेळी पदवी आणि त्यावरील पात्रता असलेल्या पदांसाठी १०,२२,१५४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत, १२ वी उत्तीर्णांसाठी ७,०८,४०१ आणि दहावी उत्तीर्ण असलेल्या पदांसाठी १२,०९,६२० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आयोग ही परीक्षा २४ जुलै ते १ ऑगस्ट २०२५ दरम्यान घेणार आहे. ही परीक्षा २४, २५, २६, २८, २९, ३०, ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
कोणत्या पदांचा समावेश आहे?
या टप्प्यात एसएससीने एकूण २४२३ पदांसाठी अर्ज मागवले होते. यापैकी ११६९ पदे अनारक्षित आहेत, तर ३१४ पदे अनुसूचित जातींसाठी, १४८ पदे अनुसूचित जमातींसाठी, ५६१ पदे इतर मागासवर्गीयांसाठी आणि २३१ पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) राखीव आहेत. तथापि, अंतिम निवड यादी जाहीर होईपर्यंत पदांची संख्या बदलू शकते.
सरकारी नोकरी: IBPS मध्ये 5208 पदांवर भरती प्रक्रिया सुरु, शेवटची तारिक आज
पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
२ जून ते २३ जून २०२५ या कालावधीत होणाऱ्या या भरतीसाठी १८ ते ४२ वर्षे वयोगटातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. अर्जातील कोणत्याही प्रकारची चूक दुरुस्त करण्यासाठी आयोगाने २८ ते ३० जून दरम्यान विशेष मुदतही दिली होती. यावेळी ज्यांनी चूक दुरूस्त करून घेतली आहे त्यांना ही परीक्षा देण्याची संधी आहे.
निवड प्रक्रियेत कडक शिस्त राहील
अर्ज सादर करताना आणि संगणक आधारित परीक्षेच्या वेळी कागदपत्रे तपासली जाणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. फक्त निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील. जर कोणत्याही उमेदवाराने केलेला दावा पडताळणीत चुकीचा आढळला तर त्याची उमेदवारी तात्काळ रद्द केली जाईल. त्यामुळे आपली सर्व कागदपत्रे योग्य पद्धतीने घेऊन जावीत आणि पहिले स्वतः त्याची पडताळणी करावी.
कोणत्या शहरात परीक्षा, प्रवेशपत्र लवकरच
एसएससीने परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची परीक्षा शहराची माहिती वेबसाइटवर (ssc.gov.in) अपलोड केली आहे. परीक्षेच्या ४ दिवस आधी प्रवेशपत्रे जारी केली जातील. म्हणजेच ज्यांची परीक्षा २४ जुलै रोजी आहे त्यांना २० किंवा २१ जुलैपर्यंत प्रवेशपत्रे मिळतील. प्रवेशपत्रे परीक्षा केंद्रावर जमा केली जातील, त्यामुळे सर्व उमेदवारांना त्यांच्यासोबत एक अतिरिक्त प्रत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुम्हीही जर यासाठी वाट पहात असेल तर ही योग्य माहिती वाचा आणि तयारीला लागा.