फोटो सौजन्य - Social Media
यश प्राप्त करण्यासाठी जिद्द आणि कष्ट फार महत्वाचे असतात. शारीरिकदृष्टया असक्षम असणाऱ्या नागा नरेशने हे सिद्ध केले आहे. लहान असतानाच दोन्ही पाय गमावणारा नागा नरेश आज Google सारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे. एका गरीब कुटुंबात जन्म घेत इतक्या मोठ्या पदावर जाण्याचा त्याचा हा प्रवास फार खडतर होता. या प्रवासात त्याने अनेक गोष्टी भोगले. अनेक गोष्टी सहन केले, तेव्हा कुठे जाऊन त्याने हा मुक्काम मिळवला आहे. चला तर मग जाणून घेऊयात नागा नरेशची ही लाखो तरुणांना प्रेरणा देणारी यशोगाथा!
आंध्र प्रदेश राज्यात गोदावरीच्या काठी वसलेल्या करुतुरा या गावात नागा नरेश याचा जन्म झाला. अतिशय गरीब कुटुंबातून येत असून त्याचे वडील हे ड्राइव्हर आहेत तर आई गृहिणी आहे. एकट्याच्या पगारात त्यांचे घर चालत नव्हते इतकी बिकट परिस्थिती होती. अशात नागा नरेशचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याने त्याचे दोन्ही पाय गमावले. कोणत्याही इस्पितळात त्याला उपचारासाठी दाखल केले जात नव्हते. पुरेसे पैसे नसल्याने त्याला प्रत्येक Hospital मधून नकार मिळत होता. अशात पोलिसांनी सरकारी हॉस्पिटलची धाव घेतली आणि तेथे त्याचे दोन्ही पाय कापण्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
घरातील बेताच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण मध्येच सोडून द्यावे लागले. शिक्षणात अनेक बाधा आल्या. पण पुढे त्याला मिशनरी स्कुलमध्ये टाकण्यात आले. तेथे त्याने अभ्यासात अव्वल नंबर मिळवले. त्याला मित्रांचाही उत्तम सहयोग मिळाला. दहावीनंतर त्याने IIT-JEE परीक्षा पात्र करण्याचे ठरवले. देशातील सगळ्यात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी या परीक्षेत त्याने देशातून ९९२वे रँक मिळवले. तसेच शारीरिकदृष्या असक्षम विभागात त्याने चौथा क्रमांक मिळवला. पुढे त्याने, IIT मद्रास येथे बी.टेक पूर्ण केले. आज नागा नरेश Google मध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे. दोन्ही पाय नसून त्याने जिद्द काही सोडली नाही आणि त्याचे ध्येय त्याने अखेर मिळवलेच.