मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढणार? (फोटो- सोशल मिडिया)
आजच्या सामन्यात नमन धीरला संधी मिळण्याची शक्यता
मिशेल सँटनरच्या जागेवर केशव महाराजला मिळाली संधी
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
Tata IPL 2026 MI Vs SRH Live Updates: आज मुंबई इंडियन्स विरुद्ध एसआरएच असा सामना होणार आहे. आजचा सामना मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. वानखेडे स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सने 5 वेळेस विजेतेपद जिंकले आहे. मात्र यंदा मुंबईची स्थिती वाईट असल्याचे (IPL 2026) पाहायला मिळत आहे. दरम्यान आज दोन्ही संघाची प्लेइंग 11 जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. आरसीबीविरुद्ध रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तो खेळत नसल्याने मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र तो आज देखील खेळू शकला नाही तर, मुंबईची डोकेदुखी वाढू शकते.
20 दिवसानंतर ‘Hitman’ मैदानावर उतरणार का? सनराझर्स हैदराबादविरूद्ध तळपणार का रोहित शर्माची बॅट
रोहितच्या जागी क्विंटन डी कॉकने आतापर्यंत समाधानकारक खेळ केला आहे. युवा फलंदाज दानिश मालेवार याला मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आलेला नाही. त्यामुळे आज नमन धीरला संधी दिली जाऊ शकते. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात नमन धीरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यात तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईची चिंता वाढली आहे.
काय आहे वानखेडे स्टेडियमचा पीच रिपोर्ट काय?
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक समजली जाते. इथली बाउंड्री लहान असल्यामुळे आणि खेळपट्टीत नैसर्गिक बाऊन्स त्यामुळे फलंदाजी करणे सोपे जाते. वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाठलाग करणे जास्त सोपे समजले जाते. त्यामुळे टॉस जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
MI Vs PBKS Pitch Report: हार्दिक पंड्या पराभवाचा ‘चौकार’ लगावणार की पंजाबला…; पहा पीच रिपोर्ट
सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. खेळपट्टी सपाट असल्याने फिरकीपटूंना विकेट मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागू शकतो. आज मुंबईत हवामान स्वच्छ असणार आहे. पावसाची शक्यता देखील नाही. उष्णता आणि आर्द्रता खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, नमन धीर, दानिश मालेवार, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रोमारिओ शेफर्ड / केशव महाराज, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक.
एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, ईशान कलिंगा, साकीब हुसेन, प्रफुल्ल हिंगे.






