विद्यार्थ्यांचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह? उत्तरपत्रिका जळून खाक. (फोटो सौजन्य - Social Media)
सदर घटना विरार पश्चिमेकडे घटीत आहे. बोळींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. १० मार्च रोजी हा धक्क्कादायक प्रकार घडला आहे. या संबंधित अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी नेल्या होत्या. मुळात, असे करण्यास परवानगी नाही. उत्तरपत्रिका या शाळेमध्येच तपासण्यात यावे असे नियम आहे. तरी त्या घरी नेल्याने संबंधित शिक्षिकेवर कारवाई होणार आहे. घरात लागलेल्या या आगीमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आगीमध्ये उत्तरपत्रिकेच्या संपूर्ण गठ्ठा जाळून खाक झाला आहे. यावर शासन काय पाउल उचलणार आणि त्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानाची कशी भरपाई करण्यात येईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
बारावीच्या उत्तरपत्रिका जळल्या
उत्तरपत्रिकेची राखरांगोळी
बारावीची परीक्षा संपली असून आता मुलं निर्धास्तपणे रिझल्टची वाट पहात आहे. भवितव्याचा हा प्रश्न असतो आणि त्यांचे सर्वस्वी भवितव्य हे मिळणाऱ्या गुणांवर अवलंबून असते. मात्र आता बोर्डाच्या पेपरची तपासणी करणाऱ्या शिक्षिकेच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थ्यांचे भवितव्य गोत्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच चक्क रिक्षा आणि एका बसमध्ये शिक्षक पेपर तपासत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ झाल्याचे दिसून येत होते. पण आता याहीपलीकडे जात शिक्षिकेच्या हलगर्जीपणामुळे बारावीच्या उत्तरपत्रिकाच जळल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून सगळीकडे संताप व्यक्त होत आहे.
परीक्षा द्यायची मुळीच गरज नाही… मिळवा एक लाखांहून अधिक वेतन; ‘या’ बँकेत बंपर Vaccency
नक्की काय घडले?
बारावीच्या उत्तरपत्रिका जळल्या
12 वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका या तपासणीसाठी शिक्षिका घरी घेऊन आली आणि या उत्तरपत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सध्या वसई विरार मधील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिक्षिकेच्या या सदर निष्काळजीपणाच्या विरोधात पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट बोळींज नानभाट रोड, आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे. मुळात पेपर घरी नेण्याची परवानगी नसतानाही या शिक्षिकेने 12 वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंगसाठी आणले आणि सोफ्यावर ठेवले. घरी कोणीही नव्हतं आणि शिक्षिकेच्या घरात अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. या दरम्यान शिक्षिकेच्या घऱातील सामानासह १२ वी च्या विद्यार्थ्यांचे पेपरही जळून खाक झाले आणि त्यासह त्यांच्या भविष्याबाबतही आता शंका निर्माण झाली आहे.
पोलीस निरीक्षकांचा तपास
पोलीसांचा पुढील तपास सुरू
हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अशा पद्धतीने पेपर घरी आणता येतात की नाही अथवा ही शिक्षिका नक्की कोणत्या शाळा वा कॉलेजमधील आहे आणि यामध्ये कोणाचा निष्काळजीपणा आहे याबाबत बोळींज पोलीस पुढील तपास करत आहेत आणि ज्याचा निष्काळजीपणा असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे बोळींजचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले आहे. दरम्यान या उत्तरपत्रिका नक्की कोणत्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आहेत आणि कोणत्या विद्यार्थ्यांचे भविष्य आता टांगणीला लागले आहे याबाबत सर्वांना काळजी लागून राहिली आहे.