फोटो सौजन्य - Social Media
अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअरिंग शिकण्याचे स्वप्न अनेक भारतीय विद्यार्थी पाहत असतात. अमेरिकेमध्ये तांत्रिक किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठे करिअर आहे. त्यामुळे अनेक भारतीय मूळ असलेले विद्यार्थी तेथे आपले करिअर करण्यासाठी जात असतात. दरम्यान, अमेरिका हा प्रगत देश आहे. एक विकसित देश आहे. येथे सिव्हिल इंजिनिअरची मागणी फार असते. या गोष्टीचा फायदा घेत अनेक भारतीय येथे जाऊन या क्षेत्रात आपले उज्वल भविष्य घडवत आहेत. एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे की २०३२ पर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये रोजगारात ५% वाढ होणार आहे. त्यामुळे, येथील विद्यार्थी तसेच जगभरातील विद्यार्थी या क्षेत्राकडे आकर्षित आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, अमेरिकेतील सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याबद्दलच्या महत्वाच्या तपशीलांबद्दल:
अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअरचा सरासरी वार्षिक पगार $1,01,160 म्हणजेच अंदाजे ₹85 लाख आहे. सुरुवातीच्या स्तरावर असलेले सिव्हिल इंजिनिअर्स दरवर्षी साधारण $63,403 (₹53 लाख) कमावतात. तर अनुभवी आणि टॉप 10% सिव्हिल इंजिनिअर्सना वर्षाला $1,50,640 म्हणजेच ₹1.27 कोटींपर्यंत पगार मिळतो. अमेरिकेमध्ये काही भागात सिव्हिल इंजिनिअर पदी असणाऱ्या उमेदवाराला चांगले आणि इतर भागांच्या तुलनेत जास्त वेतन दिले जाते. याला जबाबदार येथील विकसितपणा आहे. येथे सुरु असलेल्या निरनिराळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समुळे येथे सिव्हिल इंजिनिअरला अफाट मागणी आहे. अमेरिका येथील भव्य आणि आकर्षक इमारतींसाठीही ओळखला जातो.
एकंदरीत, आजकालच्या युगात इमारती आणि त्याचे आकर्षण देशाच्या मानतेचे चिन्ह बनले आहे. त्यामुळे अनेक देश आपले इन्फ्रास्ट्रुक्चर अधिक विकसित करण्यावर जोर देत आहेत. त्यामुळे अमेरिका यामध्येही अग्रस्थानी होण्याचे प्रयत्न करत आहे. येथील विद्यार्थ्यांना बेस्ट सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले जात आहे. विविध हाय क्वालिटी कोर्स तयार केले जात आहे. हे कोर्स विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिस्पर्धी करण्यासाठी तयार करत आहे.
सिव्हिल इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी टॉप-10 विद्यापीठे
सर्वोत्तम विद्यापीठ निवडताना त्याची रँकिंग, शिक्षक आणि उद्योगाशी जोडणी पहा. तसेच, शिक्षणानंतर तुम्हाला कामाचा अनुभव आणि चांगल्या नोकरी संधी मिळतील याची खात्री करा.