Greenland Protest 2026: ट्रम्प यांच्या 'हट्टामुळे' जग पेटले! डेन्मार्क ते ग्रीनलँड हजारो लोक रस्त्यावर; अमेरिकन दूतावासाला घेराव, पाहा थरार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Hands Off Greenland : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ग्रीनलँड बळकावण्याच्या महत्वाकांक्षेने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर रणकंदन माजवले आहे. शनिवारी डेन्मार्क आणि ग्रीनलँडची राजधानी ‘नुउक’ (Nuuk) मध्ये जनआक्रोशाचा महास्फोट झाला. “आम्ही विक्रीसाठी नाही!” आणि “आमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा!” अशा घोषणा देत हजारो नागरिक अमेरिकन दूतावासांच्या दिशेने कूच करत आहेत. ट्रम्प यांच्या विस्तारवादी धोरणाने केवळ आर्क्टिक प्रदेशच नाही, तर संपूर्ण युरोपमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
‘उगुट’ (Uagut) आणि ‘हँड्स ऑफ ग्रीनलँड’ यांसारख्या स्थानिक संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत आहेत. शनिवारी कोपनहेगनमध्ये कडाक्याच्या थंडीतही निदर्शकांनी रॅली काढून अमेरिकन दूतावासाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे, ग्रीनलँडची राजधानी नुउकमध्ये दुपारी ४ वाजता हजारो लोक ग्रीनलँडिक ध्वज घेऊन अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर जमा झाले. आयोजकांच्या मते, ही लढाई केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नाही, तर लोकशाही मूल्ये आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Senate: पुरुष अन् गर्भधारणा? डॉ. निशा वर्मांच्या उत्तराने विज्ञान विश्व थक्क; अमेरिकन सिनेटमधील ‘त्या’ वादाचा VIDEO VIRAL
या आंदोलनांना उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. “जे देश आमच्या ग्रीनलँड योजनेला विरोध करतील, त्यांच्यावर आम्ही प्रचंड आयात शुल्क (Tariffs) लादू,” असा इशारा त्यांनी दिला. ट्रम्प यांच्या मते, रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावापासून वाचवण्यासाठी अमेरिकेने ग्रीनलँडवर ताबा मिळवणे आवश्यक आहे. मात्र, डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या नेत्यांनी हा दावा फेटाळून लावत आपली सुरक्षा करण्यासाठी नाटो (NATO) समर्थ असल्याचे ठणकावून सांगितले आहे.
जानेवारी २०२५ मध्ये करण्यात आलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार, ग्रीनलँडमधील ८५ टक्के जनता अमेरिकेत सामील होण्याच्या प्रस्तावाविरुद्ध आहे. केवळ ६ टक्के लोकांनी याला पाठिंबा दिला आहे. ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेडरिक निल्सन यांनीही स्पष्ट केले आहे की, ट्रम्प यांची ही योजना बेकायदेशीर असून ग्रीनलँड आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही. विशेष म्हणजे, अमेरिकन काँग्रेसच्या (Congress) एका शिष्टमंडळानेही कोपनहेगनमध्ये जाऊन स्पष्ट केले की, ट्रम्प यांचे हे वैयक्तिक विचार आहेत आणि सर्व अमेरिकन जनता याच्या समर्थनार्थ नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protest: ‘सरकार पडणारच’, राजपुत्र रझा पहलवी यांची गर्जना; इराणची ‘आयर्न लेडी’ अटकेत, वीकेंडला पुन्हा मोठ्या आंदोलनाची तयारी
तज्ज्ञांच्या मते, ग्रीनलँडमध्ये सापडणारी दुर्मिळ खनिजे आणि बर्फ वितळल्यामुळे तयार होणारे नवीन सागरी मार्ग (Northern Sea Routes) यावर ताबा मिळवण्यासाठी ट्रम्प हे सर्व दबावतंत्र वापरत आहेत. मात्र, डेन्मार्कने ग्रीनलँडमध्ये आपले लष्करी बळ वाढवण्यास सुरुवात केली असून, युरोपीय देशांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात अमेरिका आणि युरोपीय मित्रराष्ट्रांमधील संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे.
Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याची योजना आखली असून, त्याला विरोध करण्यासाठी आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
Ans: ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जे देश त्यांच्या ग्रीनलँड योजनेला विरोध करतील, त्यांच्यावर अमेरिका प्रचंड आयात शुल्क (Tariffs) लादेल.
Ans: होय, ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक स्वायत्त (Autonomous) प्रदेश आहे, मात्र त्याचे स्वतःचे सरकार आणि संसद आहे.






