जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे बस्थानकात परिसरात शुक्रवारी दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
आकाश मोरे (३२, रा. छत्रपती शिवाजीनगर, पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण त्याच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी पाचोरा बसस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आला होता. त्याच वेळी भरधाव दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर १२ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आकाशच जागीच मृत्यू झाला.
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने धाव घेतली.घटनेनंतर पाचोरा पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके रवाना केली आहेत न्यायवैद्यक पथकाने पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह ग्रामीण गुन्हाळयात रवाना केला. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनीही येथे भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पुढील तपासाला गती देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पाचोरा शहरात गोळीबाराच्या घटनेननंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. परिसरातील सीसीटीव्ही छायाचित्र तपासण्यात आले. गोळीबार का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेल नाही.पोलीस याचा तपास करत आहे. या घटनेने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
Beed Crime: केस मागे का घेत नाही? म्हणत महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार जण जखमी…
बीड: बीडच्या केज तालुक्यातील डोका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर कोयता व तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या महिलेचे नाव बबीता भांगे असे आहे. तिच्या पतीच्या फिर्यादीवरून सात जणांवर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण जुन्या भांडण्यात झालेली मागे घेण्यावरून झाली असल्याचे समोर आले आहे.
व्हिडीओ व्हायरलची धमकी देत शारीरिक अत्याचार; ४० वर्षीय विवाहितेची आत्महत्या