File Photo : Crime
अमरावती : आंघोळीच्यावेळी काढून ठेवलेली 30 ग्रॅम सोन्याची साखळी चोराने लंपास केली. ही घटना गेल्या मंगळवारी (दि.24) दुपारी राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रवी नगरमध्ये उघडकीस आली. पांडुरंग नानाजी तायडे (वय 59, रा. रवी नगर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी मनोज ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ते पाडुरंग तायडे यांचे जावई आहेत.
हेदेखील वाचा : मोबाईल हिसकावून पळणाऱ्याला तरुणाने पाठलाग करुन पकडले; पोलिस आले अन्…
पांडुरंग तायडे हे 24 सप्टेंबर रोजी दुपारी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. यावेळी त्यांनी गळ्यातील 2 लाख 60 हजार रुपये किमतीची 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन काढून ठेवली होती. काही वेळाने त्यांना भाचीचा फोन आला. तिने पांडुरंगकडे चार हजार रुपये मागितले. मात्र, आधी दिलेले पैसे परत केले नाहीत; तर पुन्हा पैसे कसे देणार असे पांडुरंगने सांगितले.
दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी रात्री पांडुरंग तायडे हे झोपले होते. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील चैन पत्नीला दिसली नाही. त्यानंतर साखळीबाबत विचारणा केली असता, पांडुरंग यांनी ती बाथरूममध्ये पाहिली. मात्र, बाथरूममध्येही साखळी दिसत नसल्याचे सांगितले.
पांडुरंग तायडे यांनी घरात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यानंतर त्यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. पांडुरंगने त्यांचा जावई ठाकूर यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी मनोज ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेदेखील वाचा : लक्ष्मण हाकेंनी खरंच केले होते का मद्यप्राशन ? मेडिकल रिपोर्ट आला समोर