बारामती मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून काही दिवसापूर्वीच स्वतःचा जीवन संपवलं. त्या मुलीने दहावीची परीक्षा दिली होती. तिने शाळेत पहिला क्रमांक पटकाविल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलगी अभ्यासात खूप हुशार होती. तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. परंतु त्रासाला आणि छळाला कंटाळून या मुलीने स्वत:चं जीवन संपवलं.
उद्योजकाच्या घरी बंदुकीच्या धाकावर दरोडा; ड्रायव्हर व केअरटेकरला बांधून लुटले कोट्यवधींची संपत्ती
ही घटना बारामती तालुक्यातील कोहाळे खुर्द येथे घडली. पीडित मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत 78.40 टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक मिळविल्याचे समोर आले आहे. मंगळवारी (दी १३) दहावीचा निकाल लागला. त्यात ती मुलगी पहिली आली. तिचं हे यश पहायला आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ती जगात नाही. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या महिन्यात घडली आहे. तू माझ्याशी यात्रेपूर्वी लग्न कर, अन्यथा, तुझ्या घरच्यांना कोयत्याने उडवून टाकीन, अशी धमकी तरुण पीडित मुलीला देत होता. याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य आरोपीसह अन्य तिघांविरोधात पोक्सोसह तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल केला होता. दहावीची परीक्षा संपल्यानंतर तिने कोर्स सुरू केला होता, त्यासाठी ती रोज ये-जा करीत होती.
2 एप्रिल रोजी पीडित मुलीने कुटुंबीयांना तिला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. गावातील काही तरुण दुचाकीवरून तिचा पाठलाग करीत त्रास देत होते.
‘तू जर माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या घरातील कोणालाही जिवंत ठेवणार नाही, सर्वांची कोयत्याने मुंडकी उडवीन, शिवाय गावच्या यात्रापूर्वी लग्न कर अन्यथा तुझ्या घरच्यांना संपवणार,’ अशी धमकी तिला तरुणाने दिली होती.
मुख्य आरोपीचे काही मित्र तिला वहिनी असं म्हणत देखील चिडवत होते. तिच्या सोशल मिडीयावरती देखील तिला काही मेसेजही पाठविण्यात आले होते. अखेर हा त्रास असह्य झाल्याने तिने 8 एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली होती. सध्या ते तुरुंगात आहेत. परंतु, आता दहावीच्या निकालानंतर या मुलीच्या यशानंतर पुन्हा या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.सर्वत्रर गावात हळहळ व्यक्त करत होते.