संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता भवानी पेठेत बकरे आणण्यासाठी गेलेल्या तिघांवर पॉपर्टीच्या जुन्या वादातून धारदार हत्यारांनी हल्ला करत खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली उघडकीस आली आहे. यात तिघेही जखमी झाले असून, पोलिसांनी तीन सराईतांना बेड्या ठोकल्या आहेत.
फरदीन आसीफ घोडके (वय ३०), सालीम नईम घोलप (वय २१) आणि सहिल घोडके (वय २०, सर्व रा. मटण मार्केट, भवानी पेठ) व त्यांचा एक 22 वर्षाचा साथीदार अशांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मेहमुद बाबु घोडके (रा. कोपरागाव उत्तमनगर, शेवटाचा बसस्टॉप व सध्या भवानी पेठ) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदारासह अमान मेहमुद घोडके आणि रहिस याकुब घोडके या तिघांवर खुनी हल्ला करण्यात आला. दिनांक 18 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील आदमाने बिल्डींगखाली हा प्रकार घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तक्रारदार व त्यांचा मुलगा रईस घोडके यांच्याकडे भवानी पेठेत बकरे आणण्यासाठी गेले होते. मात्र जुन्या पॉपर्टीच्या वादातून आरोपींनी आपआपसात संगणमत करून त्यांच्याकडील धारदार हत्यारे हवेत फिरवून दहशत माजविली. आरोपीने त्यांच्या मुलाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून डाव्या हाताच्या वळव्यावर वार केले. तर आरोपींनी तिघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तीन दात पाडले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : काळाचा घाला! भरधाव बसची ज्येष्ठ दाम्पत्याला धडक; ज्येष्ठाचा मृत्यू
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.