लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य (Photo : Suicide)
भंडारा : तालुक्यातील भोजापूर येथे डॉक्टरने स्वतःच्या दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. ही घटना सोमवारी (दि.21) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. हर्षल पन्नालाल शेंडे (वय 29) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव असून, नंदनवन आयूष क्लिनिक या नावाने तो भोजापूर येथे दवाखाना चालवत होता.
डॉ. हर्षल पन्नालाल शेंडे हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील असून, 2 वर्षे वयाचा असताना वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे त्याची आई माहेरी भोजापूर येथे आली. मामा उमेश बांते यांनी सांभाळ केला. आई भोजापूर येथे अंगणवाडी शिक्षिका आहे. त्याचे बीएएमएसपर्यंत शिक्षण झालेले असून, गेल्या 4 ते साडेचार वर्षांपासून गावीच नंदनवन आयुष क्लिनिक या नावाने दवाखाना चालवित होता. गेल्या काही महिन्यांपासून सामान्य रुग्णालय भंडारा येथे नोकरी करत होता.
मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही
पुण्यावरून प्रशिक्षण आटोपूण हर्षल रविवारी गावी आला. त्यानंतर सोमवारी दवाखाना उघडून दुपारपर्यंत न आल्याने घरच्यांना दवाखान्यात जाऊन बघितले असता शटर बंद होते. शटर उघडून बघितले तर केबिनमध्ये दुपट्ट्याच्या साह्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. परंतु, आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. एक वर्षापूर्वी हर्षल शेंडे याचे भंडारा येथे लग्न जुळले होते. परंतु, त्यानंतर लग्न मोडले होते.
पुण्यात विवाहितेची आत्महत्या
पुण्यात यापूर्वी विवाहितेने आत्महत्या केल्याचे समोर आले. लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींकडून वाहन खरेदी करण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये आण, असा तगादा विवाहितेकडे लावण्यात आला होता. पैशांची सातत्याने मागणी करत दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून साडेचार महिन्याची गर्भवती असलेल्या महिलेने गळफास घेत जीवन संपवले.