crime (फोटो सौजन्य: social media)
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अनेक अत्याचार, बलात्काराचे प्रकरण समोर येत आहे. आता नागपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम बापानेच सख्या मुलीचे सलग पाच वर्षापासून लैंगिक शोषण केले. या बापाच्या त्रासाला कंटाळून मुलीने घरातून पळ काढला. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने बापाने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेतला असता मोठा खळबळजनक उलगडा मुलीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीचा संताप, पत्नीची केली हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शेतमजूर आहे. तो कामाच्या शोधात नागपुरात आला होता. पत्नी व दोन मुलींसह एका शेतकऱ्याकडे कमला लागला. आरोपीला दारूचे व्यसन होते. तो विकृत मानसिकतेचा होता. त्याची पत्नी त्याच्या अत्याचाराला कंटाळली होती. त्यामुळे तिने मोठ्या मुलीला पतीकडे सोडून लहान मुलीसह माहेर गाठले. दुसऱ्या व्यक्तीशी संसार थाटला. दुसरीकडे आरोपीने महिन्याभरात एका विधवा महिलेशी लग्न केले. मात्र, विकृत मानसिकता असल्यामुळे त्याची नजर स्वतःच्या मुलीवर पडली. १४ वर्षांची असतानाच नराधम बाप तिच्यावर लैंगिक अत्याचार करायला लागला. सावत्र आई असल्यामुळे तिला सांगूनही काही उपयोग नव्हता. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून मुलगी वडिलांकडून होणारा लैंगिक अत्याचार सहन करीत होती.
गर्भपात देखील केला
मुलगी १४ वर्षाची असतानाच तिच्या सोबत नराधम बाप लैंगिक अत्याचार करायला लागला. गेल्या वर्षभरापूर्वी मुलगी वडिलांकडून गर्भवती देखील राहिली. वडिलाने लगेच तिला खासगी औषध आणि गोळ्या आणून दिल्या आणि तिचा गर्भपात करवून घेतला. मुलगी २० दिवस आजारी देखील पडली. प्रकृती बघून वडिलांना दया येईल, असे बटाटा असतानाच आरोपीने पुन्हा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे सुरु केले.
बारावीत मुलीने प्रवेश घेतला होता. तिने नराधम बापाकडे नवीन कपडे आणि पुस्तके विकन घेऊन मागितले होते. मात्र, आरोपीने तिला पुस्तकासाठी पैसे दिले नाही. बापाच्या नेहमीच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या मुलीने घरातून पळ काढला. ती थेट मावशीकडे गेली. मावशीला तिने आपबिती सांगितली. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नराधम बापाने लैंगिक अत्याचाराबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला बापाला अटक केली आहे.
दिल्लीसह चार ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी; अमरावतीतील कामगाराच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल