संग्रहित फोटो
पुणे : राज्यात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. आहे. वेगवेगळ्या कारणावरुन अनेकांनी आत्महत्या करुन जिवन संपवले आहे. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पतीशी पटत नसल्याने माहेरी येऊन राहिलेल्या विवाहितेशी संबंध जुळले. मात्र, महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला नकार देऊन तिला धमकावले. या नैराश्यातून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
दिपाली जाधव (२९, रा. आण्णाभाऊ साठे वसाहत, सिंहगड रोड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ अभिजित सुधाकर भोसले (२३, रा. शाहुनगर, श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तुषार दादा कांबळे (रा. बावडा, ता. इंदापूर) आणि प्रवीण रामचंद्र चोपडे (रा. आकुर्डी खंडोबा माळ मंदिरासमोर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आण्णाभाऊ साठे वसाहतीत २६ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता घडला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, दीपाली जाधव ही तक्रारदार यांची बहीण आहे. दीपाली जाधव हिचा विवाह झाला होता. पतीशी पटत नसल्याने ती गेल्या ६-७ महिन्यांपासून आईकडे आण्णाभाऊ साठे वसाहतीत राहत होती. दरम्यान तिचे तुषार कांबळे याच्याशी संबंध जुळले. तिने तुषार कांबळे याच्याकडे लग्नाचा आग्रह केला. त्याने लग्नाला नकार दिला. तसेच प्रवीण चोपडेने तिला आदल्या दिवशी फोन करुन धमकावले होते. त्यामुळे नैराश्येतून दीपाली जाधव हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक नामदे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : महिलेला भेटायला बोलावले, नशेची गोळी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार