संग्रहित फोटो
पिंपरी : देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रिक्षाच्या भाड्याचे पैसे घेण्याच्या कारणावरून एका तरुणाने एका व्यक्तीवर खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (19 ऑक्टोबर) खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथे घडली आहे.
नसीम मोहम्मद कलाम शाह (वय 42) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील मोहम्मद कलाम कयूम शाह (वय73, जुन्नर पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम सखाराम पवार (वय 24, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा नसीम शाह यांचे वाकी येथे पंक्चरचे दुकान आहे. रविवारी दुपारी ते त्यांच्या दुकानामध्ये झोपले होते. त्यावेळी शुभम पवार तिथे आला. त्याने नसीम यांच्या डोक्यात शस्त्राने मारून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शुभम पवार याला अटक केली आहे. रिक्षाच्या भाड्याचे पैसे घेण्याच्या कारणावरून हा गुन्हा केल्याचे त्याने सांगितले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
तासगावात मित्रानेच केली मित्राची हत्या
तासगाव तालुक्यातील पाचवा मैल (निमणी) येथे शनिवारी सकाळी जुन्या वादाच्या रागातून एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. याप्रकरणी नागांव येथील दोघांविरोधात तासगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मृताचे नाव चेतन उर्फ बुलट्या दुर्व्या पवार (४५, रा. पाचवा मैल, ता. तासगाव) असे आहे. याबाबत त्यांचा भाचा गणेश सुनिल काळे यांनी रोहित उर्फ बाळया पोपट मलमे (वय २६) आणि दत्तात्रय मच्छिंद्र गुजले (वय ३६) (दोघे रा. नागांव, ता. तासगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.