काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविषयी चिंता व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सर्व भटके कुत्रे पकडा आणि एकत्र करून निवारा केंद्रात नेऊन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. असं असतांना छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एन-7 सिडको परिसरात एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास 14 जणांचे लचके तोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.
पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला
मनपाला संपर्क साधूनही कोणताच प्रतिसाद नाही
या मोकाट कुत्र्याला पकडण्यासाठी मनपाच्या पथकाशी संपर्क साधल्यानानंतरही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एक ज्येष्ठ नागरिक पायी जात असतांना समोरून आलेल्या मोकाट कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. चेहऱ्यावर आणि हाताचे मोकाट कुत्र्याने लचके तोडले. यावेळी अन्य नागरिकांनी धाव घेऊन मोकाट कुत्र्यापासून त्यांची सुटका केली. अशाच प्रकारे परिसरातील अन्य लोकांवर या कुत्र्याने हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले. काहींनी घाटी रुग्णालयात, तर काहींनी परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुत्रा चावल्यानंतर कोणते लक्षण
कुत्रा चावल्यानंतर काय करायला हवं?
बावनकुळे साहेबांचा पीए असल्याचे सांगत एका शेतकऱ्याकडून पैशांची मागणी
ज्याचे महसूल मंत्री असल्याचे सांगत शेतकऱ्याला पैश्यांची मागणी करत फसवणूक करण्यात आल्याचे समोर आलं आहे. अज्ञात व्यक्तीने आधी फोन करून बावनकुळे साहेबांचा पीए असलयाचे सांगितले त्यानंतर तुमचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर स्कॅनर पाठवत पैश्यांची मागणी करण्यात आली. शेतकऱ्याला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात धाव घेतली. या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Jharkhand Crime : नवऱ्याची रोज कटकट, संतापलेल्या बायकोने प्रायव्हेट पार्टच टाकला कापून आणि नंतर…