समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात
नागपूर : समृद्धी कॉरिडोरवर दोन वाहनांच्या अपघातातील जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना मागून येणाऱ्या एका वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात शुक्रवारी (दि. 21) पहाटे तीन वाजताच्या सुमारास झाला. या विचित्र अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. तर अपघातातील तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
डोणगावपासून जवळच असलेल्या समृद्धी महामार्गावर एचपी पेट्रोल पंपजवळ चॅनल नंबर 268 वर मुंबई कॉरिडोरवर (एमएच 21/बीएच- 8299) या क्रमांकाच्या ट्रकने आयशरला पाठीमागून धडक दिली. चालक शेख इसाक शेख बादशाह (रा. जालना) हा 80 च्या लेनमधून जात असताना मागून येणारे आयशर चालक मिराज अहमद याला डुलकी लागली. त्यामुळे समोरील ट्रकला मागून जबर धडक दिली. या धडकेत आयशरमधील मिराज अहमद आणि अमजद अली (रा. अमेठी, उत्तर प्रदेश) यांना गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलिस, रॅपिड अॅक्शन फोर्स व डोणगाव पोलिस यांनी बचाव व मदतकार्य करत असताना समृद्धी महामार्गावर काही वाहने थांबलेली होती. पाठीमागून येणाऱ्या कंटेनरचा चालक सद्दाम खान (रा. उत्तर प्रदेश) याने जखमींना अॅम्बुलन्सद्वारे सामान्य रुग्णालय मेहकर येथे पाठविण्यात आले. तर गंभीर जखमी अमजत अली यांना बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
फुरसुंगी परिसरात कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
हडपसर-सासवड रस्त्यावर फुरसुंगी परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सूरज शरद धायडे (वय २३, रा. फुरसुंगी, हडपसर) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश शरद धायडे (वय १९) याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सूरज रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्याने जात होता. तेव्हा पॉवर हाऊससमोर भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या सुरजचा मृत्यू झाला.