कोल्हापूर: कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि प्राचार्यांचे फोटो लावून अघोरी प्रकार केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार करवीर तालुक्यातील स्मशानभुमीत घडला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सामोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, संचालक आणि प्रचार्याचा फोटो लावून अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिन्ही संस्था सदस्यांच्या फोटो गुलाल, हळद- कुंकू टाकून टाचण्या मारण्यात आल्याचे दिसून आले. ही घटना करवीर तालुक्यातील वडकशिवाले येथून बाचणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत ही पूजा करण्यात आली. संस्थेतील लिपिकांना पदोन्नती दिल्याच्या नाराजीतून असा काही प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नग्न आवस्थेत अघोरी पूजा
आता नुकताच काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील जयसिंगपूरमधील उदगाव वैकुंठधाम स्मानभूमीत असाच एक प्रकार समोर आलं होता. एक दाम्प्त्य उदगाव वैकुंठधाम स्मानभूमीमध्ये नग्न आवस्थेत अघोरी पूजा करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या मयत व्यक्तीचे कुटुंबीय तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनासाठी आले होते. मात्र तेव्हा तिथे चितेची राख नव्हती. तर काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केल्याचे पाहायला मिळाले. याची माहिती त्या कुटुंबियांनी ग्रामपंचायतीत दिली. यानंतर ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
कृत्रिम तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, कालपासून होते बेपत्ता