अकोल्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अकोल्याच्या तहसील कार्यालय विभागातील संजय गांधी निराधार योजनेत कार्यरत महसूल सहाय्यक खुले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका विधवा महिलेला रात्री भेटल्यास पगाराचे काम करून देतो, असं महसूल सहाय्यक यांनी म्हंटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने अकोल्यात संताप व्यक्त होत आहे.
गुंड निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या, आणखी एक गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
काय आहे प्रकरण?
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी पीडित महिला तहसील कार्यालयात गेल्यानंतर महसूल सहाय्यक खुळे यांनी तिचा हात पकडला आणि रात्री भेटल्यास पगाराचे काम करून देतो असे म्हणत तिच्यासोबत गैरवर्तन केले. याचवेळी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर देखील “तू मला भेट” असे सांगून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप महिलेने पोलिसांकडे केला आहे.
गुन्हा दाखल
महिलेने दिलेल्या लिखित तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी तात्काळ भारतीय दंड संहितेच्या संबंधित ७४ कलमान्वये महसूल सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणांनंतर आता तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांची पुढील काय कारवाई कारण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, संबंधित महसूल सहाय्यकाविरुद्ध कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. घटनेचा पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.
गोमांस विक्रीवरून दोन गट आमने-सामने, बजरंग दल कार्यकर्त्याला मारहाण
अकोला शहरात दोन गट आमने-सामने आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी एका गोमास विक्री करणाऱ्या एका दुकानावर धाड टाकली. यानंतर मोठा गोंधळ उडाला. दोन गट आमने- सामने आले आणि त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास पोलिसांनी बैदपुरा येथील गोमास विक्रीच्या संशयित दुकानावर छापा टाकला. या कारवाईनंतर परिसरात दोन गट जमा झाले आणि त्यांच्यात तणाव वाढला. या गोंधळात बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच , दुसर्या गटाकडून दगडफेक करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलीस जेव्हा घटनास्थळी गेले, तेव्हा पोलिसांना मारहाण झाल्याचा दावा केला गेला होता. दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी हा दावा खोडून काढला असून, पोलिसांवर कोणताही हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेत बजरंग दलाचा एक गोरक्षक किरकोळ जखमी झाला असून, त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.