संग्रहित फोटो
सातारा : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे अशा घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आली आहे. या घटनेची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनांक २९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणातून अक्षय दिलीप माने (रा. धनगरवाडी, ता. सातारा) यांचा कोडोली, सातारा येथील पाच एकराच्या मोकळ्या प्लॉटमध्ये धनंजय यादव, प्रथमेश उर्फ पत्या रमेश चव्हाण, योगेश नंदकुमार खवळे, रोहन नामदेव जाधव आणि त्यांचा एक मित्र (सर्व रा. कोडोली, ता. सातारा) यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे.
खुनाची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली आहे. संशयितांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित योगेश नंदकुमार खवळे आणि एकजण फरार आहे. त्यांच्या तपासासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. खुनाच्या या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.
मित्रांनीच केला मित्राचा घात
कॅनोलच्या शेजारी बसून पार्टी करत असताना मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर दोन मित्रांनी एका मित्राला वाहत्या पाण्यात टाकून जीवे ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षी (२०२४) घडलेल्या या घटनेत हडपसर पोलिसांनी आकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास करून खूनाचा प्रकार उघडकीस आणला आहे. विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वैभव मनोज जाधव (वय ४२, छत्रपती संभाजीनगर) व अशिष अशा दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसर पोलिसांत हसीना शिकलगार (वय ३६) यांनी तक्रार दाखल केली आहे.