संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता आंबेगाव पठार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत काम करणाऱ्या कामगाराचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मित्रानेच त्याचा खून केला आहे. दोन दिवसानंतर खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पसार झालेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नयनप्रसाद (वय ४२) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नयनप्रसाद हा मुळचा बिहारमधील आहे. तो फर्निचर तसेच पेटींगचे कामे करतो. ते आंबेगाव पठार येथील तोरणा कन्स्ट्रक्शन येथे काम करत होता. त्याच्यासोबत त्याच्या गावातील एकजन होता. दरम्यान, मध्यरात्री एकच्या सुमारास इमारतीमधून उग्र वास येऊ लागल्याने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सावळाराम शाळगावकर यांच्या पथकाने धाव घेतली.
पाहणी केल्यानंतर मृतदेह आढळून आला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू हा २४ तासांपूर्वी झाला असावा असे सांगितले. तपासात त्याचा खून त्याचा साथीदार व मित्र असलेल्या आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. तात्कालिक कारणावरून खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : गांजा विकणाऱ्या दोन महिलांना ठोकल्या बेड्या; विटा पोलीसांची मोठी कारवाई
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.