बंगळुरू: बेंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये एक २१ वर्षीय तरुणाने त्याच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. एवढेच नाहीतर पीडित मुलीला फोन करून तिला गोळ्यांची गरज आहे का? असं देखील विचारल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी तरुण एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. पीडित तरुणी ही सातव्या सत्रात शिकत असून आरोपी पाचाव्या पाचव्या सत्राचं शिक्षण घेत आहे. दोघेही एकमेकांना मागील तीन महिन्यांपासून ओळखत होते. पीडितेचा एका विषयात बॅकलॉग असल्याने ती अधूनमधून पाचव्या सत्राच्या वर्गात जात लेक्चरसाठी जायची, तिथेच तिची जीवन गौडा नावाच्या तरुणाशी ओळख झाली.
१० ऑक्टोबर रोजी कॉलेजमध्ये लंच ब्रेक झाला होता. जीवनने पीडितेला फोन करून खाली भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर, काहीतरी कारण सांगून त्याला भेटण्यासाठी गेली. मात्र, आरोपी तिला आर्किटेक्चर ब्लॉकच्या सातव्या मजल्यावर घेऊन गेला आणि पीडितेला त्याने अचानक घट्ट पकडलं. ती कशी तशी निसटून सहाव्या मजल्यावर पोहोचली, पण जीवन तिचा पाठलाग करत तिथे पोहोचला आणि तिला पुरुषांच्या वशरूममध्ये ओढत नेलं. त्यानंतर, आरोपीने आतमधून दरवाजा बंद केला. पिडीतेकडून तिचा फोन हिसकावून घेतला आणि बलात्कार केलं. ही संपूर्ण घटना जवळपास 1:30 ते 1:50 दरम्यान घडली.
बलात्कारानंतर केला फोन आणि…
या भयानक घटनेनंतर संध्याकाळी जीवनने मुलीला फोन केले आणि तिला गोळ्यांची गरज आहे का? असं विचारलं. पीडिता अतिशय घाबरली होती आणि पुढचे काही दिवस गप्प राहिली. नंतर, तिच्या दोन मैत्रिणींनी पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेबद्दल सांगण्याचं धाडस केलं. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी जीवन गौडाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 64 अंतर्गत गुन्हा दाखल केला, जो बलात्काराशी संबंधित आहे. त्याच दिवशी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना पीडितेच्या संमतीने घडली असल्याचा चौकशीदरम्यान आरोपी तरुणाने दावा केला. आता पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत असून कॉलेज कॅम्पसमधून पुरावे गोळा करत केले जात आहेत.
गुंड निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या, आणखी एक गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?