विकतचे पदार्थ खाऊन पोट बिघडते? पावसाळ्यात टायफॉइड आणि पोटाच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे सोपे उपाय
पावसाळ्यात टायफॉइड आणि तीव्र गॅस्ट्रोएन्टेरायटिस (Acute Gastroenteritis) या आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. योग्य काळजी घेतल्यास या संसर्गजन्य आजारांपासून मोठ्या प्रमाणात बचाव करता येऊ शकतो. मात्र, अनेकजण ताप, उलट्या, जुलाब किंवा पोटदुखी यांसारख्या सुरुवातीच्या लक्षणांकडे ‘हंगामी आजार’ म्हणून दुर्लक्ष करतात, ही मोठी चूक ठरते.या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. नेहमी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणीच प्या. ताजे आणि स्वच्छ अन्न खा. अस्वच्छ ठिकाणी तयार होणारे रस्त्यावरील खाद्यपदार्थ, कच्ची फळे किंवा सॅलड खाणे टाळा.याबद्दल डॉ. आशीष नंदी, प्रमुख अपघात व आपत्कालीन वैद्यकीय विभाग, रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
हातांची स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुण्याची सवय लावा.याशिवाय, अन्नपदार्थ योग्य पद्धतीने साठवणे आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणेही आवश्यक आहे, जेणेकरून अन्नामध्ये जीवाणूंचा संसर्ग होणार नाही. ताप, जुलाब, उलट्या किंवा पोटदुखीची लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास स्वतःहून अँटिबायोटिक्स घेण्याऐवजी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हवामानातील बदलांमुळे पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. वाढते तापमान, अनियमित पाऊस, पूरस्थिती आणि अपुरी स्वच्छता यामुळे टायफॉइड आणि तीव्र गॅस्ट्रोएन्टेरायटिससारख्या संसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंची वाढ वेगाने होते. शहरीकरण वाढत असताना पावसाळ्यात पाण्याचे प्रदूषण आणि अपुरी स्वच्छता यामुळे अशा संसर्गांचा धोका आणखी वाढतो.
पावसाळ्यातील संसर्ग रोखण्यासाठी केवळ वैयक्तिक स्वच्छता पुरेशी नाही. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छता व्यवस्थेची सुधारणा, संसर्गजन्य आजारांवर प्रभावी देखरेख आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. समुदाय स्तरावर योग्य तयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.
Health Tips: रात्री उशिरापर्यंत जागे राहता? ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो, मिळेल गाढ आणि शांत झोप
व्यक्तिगत पातळीवरही प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. ताप, पोटदुखी, जुलाब किंवा उलट्या यांसारखी लक्षणे दिसल्यास ती केवळ हंगामी आजार समजून दुर्लक्षित करू नयेत. वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास आजाराचे लवकर निदान होऊन योग्य उपचार मिळू शकतात. त्यामुळे गुंतागुंत टाळता येते आणि कुटुंब तसेच समाजात संसर्ग पसरण्याचा धोकाही कमी होतो.हवामान बदलाचा परिणाम वाढत असताना पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वैयक्तिक काळजीबरोबरच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सक्रिय आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवणे अत्यंत आवश्यक आहे.
Ans: पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छ अन्न आणि खराब स्वच्छतेमुळे टायफॉइडसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढतो.
Ans: सतत ताप येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, भूक न लागणे, पोटदुखी, जुलाब किंवा बद्धकोष्ठता ही टायफॉइडची सामान्य लक्षणे आहेत.
Ans: नेहमी उकळलेले किंवा शुद्ध पाणी प्या, ताजे आणि गरम अन्न खा, हात स्वच्छ धुवा आणि रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळा.






