काय घडलं नेमकं?
कल्याणच्या मलंग रोड परिसरातील काकाचा ढाबा येथील नीलकंठ सोसायटीत ही घटना घडली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या सोसायटीतील एका बंद घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा घर बाहेरून लॉक होते. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात सगळीकडे शांतता होती, पण बाथरूमच्या दिशेने जाताच पोलिसांना संशयास्पद गोणी आढळून आली. ती गोणी उघडली असता, पोलिसांना आत सडलेल्या अवस्थेत एका पुरुषाची ‘डेड बॉडी’ आढळली. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले.
Beed Crime: बीडच्या बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन? एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा
२४ तास बाथरूमचा नळ सुरु
तपासात समोर आले की आरोपी महिलेने प्रियकराची हत्या डोक्यात वार करून धारधार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरला. अत्यंत थंड डोक्याने केलेल्या या हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी महिलेने मृतदेह गोणीत भरला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने बाथरूमचा नळ २४ तास सुरु ठेवला. सोसायटीत दररोज पाणी सुटले की ते पाणी थेट गोणीवर पडत होते, ज्यामुळे मृतदेह पाण्यात भिजून लवकर सडत होता आणि रक्ताचे डागही वाहून जात होते.
व्हॉईस मेल मध्ये काय?
हत्या केल्यांनतर आरोपी महिला थेट कोलकात्याच्या दिशेने फरार झाली. मात्र पळून गेल्यानंतर तिने घरमालकाला एक व्हॉईस मेल पाठवला. या व्हाईस मेलमध्ये तिने म्हटले, “फ्लॅटमधील बाथरूमचा नळ चालू राहिला आहे आणि तिथे एक डेड बॉडी ठेवली आहे.” हा व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला असून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून ‘मोस्ट वाँटेड’ आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे. पोलिसांची विशेष पथके कोलकात्याकडे रवाना झाली आहेत. या हत्येमागील नेमके कारण आणि इतर आरोपींचा सहभाग याचा तपास सध्या सुरू आहे.
Ans: कल्याणमधील नीलकंठ सोसायटीतील फ्लॅटच्या बाथरूममध्ये गोणीत.
Ans: बाथरूमचा नळ 24 तास सुरू ठेवला.
Ans: आरोपीने घरमालकाला पाठवलेल्या व्हॉईस मेलमुळे.






