धक्कादायक! प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं आयुष्य; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतांना आणखी एक बीडमध्ये एक अशीच घटना घडली आहे. बीडच्या एका विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
माणुसकी हरवली ! पुण्यात अपघातानंतर मदत करण्याऐवजी दाम्पत्याला लुटलं
आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव प्रियांका खाकाळ आहे. तिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विषारी औषधाचा सेवन करून आत्महत्या केली. 13 वर्षांपूर्वी प्रियंका यांचा विवाह बापू खाकाळ याच्याशी झाला होता. मात्र अशात नवीन घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करत सतत जाच केला जात होता. याच जाचाला कंटाळून प्रियंका यांनी विषारी द्रव्य प्राशन करत आपलं जीवन संपवलं आहे. दरम्यान या प्रकरणात सासरा, सासू, दीर, जाऊ या चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा राज्यात अशाच घटना घडत आहेत. अशा घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Pune Crime News: ‘घरात बोलवून मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध…’
पुण्याच्या वडगाव मावळ येथून अशीच एक दुर्दैवी घटना समोर अलायी आहे. वडगाव मावळमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिक संतप्त झाले असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
देवगडमध्ये भीषण अपघात, रिक्षा आणि एसटीची धडक; चार जणांचा जागीच मृत्यू