सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालं आहे तर एकाची प्रकृती गंभीर आहे. रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण धडक झाली. ही घटना देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावात घडली आहे.
Crime News: उरळी कांचनमध्ये दोन मोबाईल शॉपी फोडल्या; तब्बल 75 लाखांचा ऐवज केला लंपास
समोर आलेल्या माहितीनुसार,मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे. मृतकाचे नाव संकेत घाडी, संतोष गावकर, रोहन नाईक आणि सोनू कोळंबकर असे आहे. तर रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विजयदुर्ग- मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे रिक्षात असलेल्या प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झालं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई केली जात आहे. मात्र या भीषण अपघाताच्या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
माणुसकी हरवली ! पुण्यात अपघातानंतर मदत करण्याऐवजी दाम्पत्याला लुटलं
पुणे : कोंढवा भागात दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याची दुचाकी स्लीप होऊन अपघात झाल्यानंतर दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांची सोन साखळी तसेच दुचाकीची चावी काढून पोबारा केल्याची घटना घडली आहे. चालत्या दुचाकीवरून चोरी, अडवून लुटमार तसेच पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावल्या जात असताना आता अपघातानंतर देखील लुटण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
मदतीच्या बहाण्याने त्यांना बोलून लुटले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपुर्वी रात्री दहाच्या सुमारास ही घटना टिळेकरनगर येथील श्रीराम चौकात घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांची पत्नी कोंढवा बुद्रुक येथे राहण्यास आहेत. रात्री दहाच्या सुमारास ते कामानिमित्त बाहेर गेले होते. तेथून ते घरी निघाले होते. टिळेकरनगर येथील श्रीराम चौकात एका खड्यात त्यांची दुचाकी स्लीप झाली. त्यात ते खाली पडले. तेव्हा त्यांना मदतीच्या बहाणा करून दोघेजन त्यांच्याजवळ आले. मात्र, त्यांनी गळ्यातील सोन साखळी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Pune Crime News: ‘घरात बोलवून मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध…’; वडगाव मावळमध्ये घडली संतापजनक घटना