(फोटो सौजन्य: X)
माॅडलिंग आणि फल्म इंडस्ट्रीमध्ये केलं होतं काम
ट्विशा शर्मा ही उत्तर प्रदेशातील नोएडा येथील रहिवाशी होती. तिने MBA मध्ये शिक्षण पूर्ण केलं होतं आणि यासोबतच मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रातही ती कार्यरत होती. दिल्लीमध्ये ती बऱ्याच काळापासून नोकरी करत होती. इतकंच नाही तर माॅडलिंग आणि चित्रपट क्षेत्रातही तिने काम केलं होतं. ती मिस पुणे देखील राहिली होती, अनेक तेलुगु चित्रपटांमध्ये तिने काम केलं होतं. यासोबतच ती एक योगा ट्रेनर देखील होती.
२०२५ साली, भोपाळचे वकील समर सिंह यांच्यासोबत तिचा विवाह झाला. माहितीनुसार, समर सिंह यांची आई गिरिबाला सिंह या माजी न्यायाधीश होत्या. एक चांगलं प्रभावशाली घराणं आहे असा विचार करत आई-वडिलांनी त्रिशाचं लग्न तर लावून दिलं पण काही महिन्यांतच तिला सासरच्या जाचाला सामोरं जावं लागलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १२ मे च्या रात्री त्रिशाने आपल्या सासरच्या घरात फाशी घेऊन स्वत:च आयुष्य संपवलं. या घटनेनंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं जिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. त्या रात्री ती आपल्या कुटुंबाच्या संपर्कात होती आणि तिने घर सोडून जाण्याचं वक्तव्य केल्याची माहिती समोर येत आहे.
कुटुंबाने केलेल्या आरोपांनुसार, लग्नानंतर ट्विशाचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. ती गरोदर असताना नवऱ्याने तिच्या चारित्र्यावर प्रश्न देखील केल्याचा आरोप आहे. आईसोबत ट्विशाचे चॅट्स समोर आल्यानंतर या घटनेले नवे वळण मिळाले. यात तिने आपल्यासोबत होणाऱ्या त्रासाचे वर्णन केले. तिने यात म्हटले की, त्या घरात तिला अडकल्यासारखं वाटतं आहे.
सासरच्यांनी ट्विशावर केला आरोप
दुसरीकडे आरोपी पक्षाने या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे. सासू, गिरीबाला सिंग यांनी ट्विशाला अमली पदार्थांचे व्यसन असून ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा दावा करत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. याचिकेत असंही म्हटलं गेलंय की, तिच्या वागणूकीत बदल दिसून आला होता आणि कुटुंबालाही याची माहिती होती. तर ट्विशाच्या वडिलांनी आरोप केली आहे की, प्रभावशाली कुटुंब असल्याकारणाने तपास योग्य पद्धतीने होत नाहीये. त्यांनी निष्पक्ष चाैकशी आणि न्यायालयीन देखरेखीची मागणी केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून कुटुंबाने अत्यंसंस्कार पुढे ढकलत दुसऱ्या शवविच्छेदनाची मागणी केली आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, जोपर्यंत निष्पक्ष तपास होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत.






