पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पुणे पोलिसांनी काळा प्रकार उघडकीस आणला आहे. आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली स्पा सेंटर चालवलं जात होत. मात्र आत मध्ये वेश्या व्यावसायिक चालवला जात होता. ही माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी धाड टाकून या कारवाईत 5 मुलींची सुटका केली आहे. दोन ठिकाणी पुणे पोलिसांनी कारवाई केल्या आणि मुलींची सुटका केली.
मुकुंदनगर आणि मार्केटयार्ड या दोन ठिकाणी सुरू होता वेश्याव्यवसाय. नावाला फक्त पाटी स्पा सेंटरची लावण्यात आली होती. एका ठिकाणी 4 महिला तर दुसऱ्या ठिकाणी 1 महिला अशा 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत एका संभाजीनगरच्या महिलेला अटक करण्यात आली आहे . तर 38 वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.
पुण्यात काय सुरू आहे ?
पुण्यात दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोळीबार, कोयता गैंग, खून , टोळीयुद्ध अशा सगळ्या घटनांनी पोलीस बेजार झाले आहेत. मात्र दुसरीकडे स्पा सेंटरच्या नावाखाली जर वेश्या व्यवसाय चालवले जात असतील तर पुणे पोलीस काय करत आहेत. या सगळ्या सेंटरची चौकशी होते का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे पोलिसांकडून कारवाई करत गुन्हा दाखल केल आहे. आयुर्वेदीक मसाजच्या नावाखाली घाणेरडे प्रकार केले जात होते. दोन ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे .
शहरातील स्पा सेंटरवर नियंत्रण कोणाच?
शहरात असे अनेक स्पा आहेत की जिथे या आधी पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र तरीही अनेक स्पा सेंटर काळे धंदे सुरूच ठेवतात. अनेक ठिकाणी पैसा कमावण्यासाठी अशा गोष्टींचा उपयोग केला जातो.पुणे पोलीस शहरातील अशा काळे धंदे करणाऱ्या स्पा सेंटरवर काय कारवाई करतात हे पाहावे लागेल.
कामावरून काढल्याचा बदला! २ मजुरांनी ठेकेदाराच्या ३ वर्षीय मुलीचं अपहरण
पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कामावरून काढल्याचा रागातून दोन मजुरांनी बदला घेण्यासाठी ठेकेदाराच्या मुलीचा अपहरण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिला इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये चढवलं. पोलिसांनी काही तासातच तीन वर्षाच्या मुलीची सुटका केली असून आरोपींना अटक केली आहे.
Pune Crime: लंडन रिटर्न असल्याचा फायदा घेतला, विद्यापीठालाच घातला २ कोटीचा गंडा; नेमकं प्रकरण काय?