राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील जहाजपूर येथे शुक्रवारी एका हातगाडीला एका कारणे धडक दिल्याने कारचालकास बेदम मारहाण करून त्याला ठार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे शहरात जातीय तणावाची स्थिती निर्माण झाली असून परिसरात घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबबस्त तैनात करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी उशिरा घडली.
येणेगुर येथील एका विद्यालयातील २९ विद्यार्थ्यांना विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पसंख्यांक समुदायाच्या धार्मिक स्थळाजवळ आलू कांद्याच्या हातगाडी उभी होती. त्यावेळे टाँक शहरातील चार तरुण कार घेऊन जहाजपूर आले होते. यावेळी त्यांची कार त्या हातगाडीला धडकली. संतापलेल्या लोकांनी कारचालक युवकाला मारहाण केली. आणि या मारहाणीत तो ठार झाला. युवकाच्या मृत्यूची बातमी कळताच जहाजपूरच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात संतप्त लोकांची मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच जहाजपूरचे आमदार गोपीचंद मीना यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मृतकाचे नाव सीताराम आहे. परिसरात सध्या मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून अनेकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. बाजारपेठही बंद ठेवण्यात आल्या आहे.
मृतकाच्या मेहवण्याने सांगितले की, त्याचा मेहुणा सिकंदर. मित्र त्याचा मेहुणा सिकंदर, मित्र दिलखुश, सीताराम आणि दीपक यांच्यासोबत शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता जहाजपूर येथे आले होते. तकिया मशिदीजवळ रईस फकीर यांचा कांद्याचा ठेला लावलेला होता. याचवेळी कार ठेकेला धडकली, ज्यामुळे कांदे रस्त्यावर पसरले. सीताराम गाडीतून खाली उतरून ठेकेवाल्यासमोर हात जोडून नुकसान भरपाईची मागणी करू लागला. पण त्याचवेळी मशिदीतील दुकानांमधील बाबू खान, वसीम, शाहरुख, सद्दाम, हसनैन, मोहसिन, साहिल, इस्लाम, तनवीर, शरीफ, हनीफ, आबिद, ईदरीस, गुलजार, मूर्तजा आणि त्यांच्यासोबत २०-२५ लोक आले आणि त्यांनी सीतारामला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. सीतारामचा जागीच मृत्यू झाला. जमावाने त्यांच्या गाडीचे वायर कापले. त्यामुळे ते बाईकने सीतारामला रुग्णालयात घेऊन गेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
खळबळजनक ! दिव्यांगाचा गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार; पीडिता शेतातील गोठ्यात थांबली अन्…