कर्नाटक मध्ये विद्यार्थ्यांवर होळीच्या दिवशी रसायने आणि फिनायल टाकले (फोटो - istock)
कर्नाटक : होळी आणि धुलिवंदन सणाचा मोठा उत्साह दिसून देशभरामध्ये दिसून येत आहे. मात्र कर्नाटकामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. होळीच्या बहाण्याने विद्यार्थींनींवर हल्ला करण्यात आला आहे. गडग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यात एका गावात शुक्रवारी झालेल्या होळी दिवशी ही घटना घडली. यामध्ये चार पाच दुचाकीस्वारांनी शाळेतील विद्यार्थींनीचा पाठलाग करत त्यांच्यावर रासायनिक रंग फेकले. यामुळे विद्यार्थींनी गंभीर जखमी झाल्या आहेत. आता त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून या घटनेवर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
कर्नाटकमध्ये सरकारी शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीच्या काही विद्यार्थींनी परीक्षा देण्यासाटी जात होत्या. लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुवर्णगिरी बस स्टॉपवर त्या बसची वाट पाहत होत्या. बसमध्ये चढताच काही तरुणांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या अंगावर रंग, अंडी आणि शेणखत फेकलं. तपासात विषारी द्रवात फिनाइल असल्याचंही स्पष्ट झालं आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. तसेच होळीच्या बहाण्याने मुलीवर केले जाणारे अत्याचार हा मुद्दा देखील समोर आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
टवाळखोर मुलांनी त्रास देण्यास सुरुवात केल्यामुळे विद्यार्थींनी घाबरल्या होत्या. त्यांनी लगेचच आलेल्या बसमध्ये प्रवेश केला. मात्र तरी देखील टवाळखोर मुले त्रास देण्याची थांबली नाहीत. विद्यार्थींनी बसच्या खिडक्या बंद केल्यानंतर त्यांनी रसायने टाकण्यास सुरुवात केली. चढल्यावर रसायने मिसळेले रंग त्यांच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. प्राथमिक तपासानुसार, विषारी द्रवात शेण, अंडी, फिनाइल आणि रंग होते. यामुळे विद्यार्थींनीना श्वास घेण्यास त्रास होत असून छातीत दुखणे आणि इतर लक्षणे दिसू लागली आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तीन विद्यार्थींनीची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जातंय.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गुप्तचर संस्थेच्या सापळ्यात अडकलेला भारतीय अधिकारी
पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (UP ATS) ने लखनऊ येथून अटक केली आहे. संबंधित व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. फिरोजाबाद जिल्ह्यातील हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन म्हणून कार्यरत असलेला रवींद्र कुमार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन म्हणून कार्यरत होता आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांबाबतची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवत होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था (ISI) परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकारच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत असल्याची माहिती UP ATS ला काही दिवसांपासून माहिती मिळाली होती. याशिवाय या एजंटने वेगवेगळी नावे आणि बनावट ओळखपत्रे वापरून भारतीय कर्मचाऱ्यांशी मैत्री वाढवली. भारतीय सैन्य आणि सरकारी संस्थांबाबतची संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी या कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रलोभन दिले जात होते.