छत्रपती संभाजीनगर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका सराईत गुंडाने चक्क मैत्रिणीवरच गोळीबार केला आहे. या गोळीबाराच्या घटनेत गोळी ही तरुणीच्या हाताला लागल्याने तरुणीचे प्राण बचावले आहे. त्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबार करणाऱ्या सराईत गुंडाचे नाव सय्यद फैजल उर्फ तेजा असे आहे. तर जखमी झालेल्या मैत्रिणीचे नाव राखी मुरमरे (२२वर्षीय) असे आहे.
जामिनावर बाहेर होता आरोपी
पुढे आलेल्या माहितीनुसार, ही घटना शहरातील किलेअर्क परिसरात रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.आरोपी तेजा हा केवळ 8 ते 10 दिवसांपूर्वीच जेलमधून जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर शस्त्रसाठा, बलात्कार, ड्रग्ज तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसह एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला एनडीपीएस पथकाने अटक केली होती.
गोळीबाराचे कारण काय?
काल (सोमवारी) रात्री फैजलची मैत्रीण किलेअर्क भागात त्याच्या घरी गेली होती. तिथे त्यांच्यामध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि याच रागातून तेजाने त्याच्याकडील बंदुकीने मैत्रिणीच्या दिशेने गोळी झाडली. गोळी तिच्या हाताला लागली आणि ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
आरोपी अटक
या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी सय्यद फैजल उर्फ तेजाला तात्काळ अटक केली आहे. तसेच, जखमी मैत्रिणीला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणी जबाब देण्याच्या स्थितीत नव्हती, त्यामुळे पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक ! संभाजीनगरमध्ये ग्रामसेविकेवर अत्याचार
एका ग्रामसेविकेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेवराई (जि.बीड) पंचायत समितीच्या सभापतीच्या पतीने छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी अत्याचार केल्याचे समोर आले.
दीपक प्रकाश सुरवसे (रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) असे अत्याचार करणाऱ्याचे नाव असून, त्याच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभापतीच्या पतीने पीडितेवर अत्याचारावेळी अश्लील फोटो व व्हिडिओ काढून, हे प्रकरण उघड केल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०१९ मध्ये दीपक सुरवसे हा त्या काळी गेवराई पंचायत समितीच्या सभापतीचे पती होता आणि समितीचा कारभार पाहत होता. सप्टेंबर २०२२ मध्ये सुरवसे याने पीडितेला कामाबाबत बोलायचे आहे, असे सांगून छत्रपती संभाजीनगर येथील व्हिट्स हॉटेलात बोलावले.
हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आरोपीने रूममध्ये बोलावून, कामाच्या बहाण्याने अचानक जबरदस्ती केली. महिलेला विरोध केल्यावर नोकरी ठेवायची असेल तर गप्प बस, अशी धमकी देत अत्याचार केला. अत्याचारावेळी आरोपीने पीडितेचे फोटो व व्हिडिओ काढून, हे कोणाला सांगितल्यास ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर