(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या छाप्यांदरम्यान रिलायन्स एडीए ग्रुपशी संबंधित २३ परस्परसंबंधित संस्थांची चौकशी करण्यात आली. असा आरोप आहे की, RCFL आणि RHFL ने घेतलेली बँक कर्जे ग्रुपच्या इतर कंपन्यांकडे वळवण्यासाठी या संस्थांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे कर्ज देणाऱ्या बँकांना मोठे आर्थिक नुकसान झाले.
तपास यंत्रणेने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), रिलायन्स एडीए ग्रुपचे माजी सेक्रेटरियल हेड आणि आरएचएफएलचे माजी मुख्य ट्रेझरी कन्सल्टंट यांच्या निवासस्थानांचीही झडती घेतली.
मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जारी केलेल्या शोध वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सीबीआयने सांगितलं आहे. या झडतीदरम्यान अनेक महत्त्वाचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे पुरावे देणारे दस्तऐवज जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC यांच्याकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे सीबीआयने यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड RCom, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड RHFL, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड RCFL आणि रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड RTL यांच्या विरोधात सात FIR नोंदवले होते. या सात प्रकरणांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि LIC ला अंदाजे २७,३३७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
रिलायन्स एडीए ग्रुपशी संबंधित प्रकरणांमध्ये सीबीआयने यापूर्वी ३८ ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. एजन्सीने चार आरोपपत्रे दाखल केली असून सात आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
CBI ने म्हटले आहे की, या प्रकरणांचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. एजन्सीने म्हटले आहे की, ती निष्पक्ष, व्यापक आणि जलद तपासासाठी कटिबद्ध आहे. सध्या, धाडीदरम्यान जप्त केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहावं लागले.






