Crime news live updates
पुण्यातील राजगुरूनगर जवळील चांडोलीत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी आचाऱ्याला आचारी कामात मदत करत होती. त्याच आचारी ने मुलीसोबत अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. आता, चांडोली येथील केदारेश्वर बंधाऱ्यावर या मुलीची ओढणी आणि चप्पल आढळून आल्याने पीडित मुलीने आत्महत्या केली काय ? अशी शंका उपस्थित होत असून सध्या बंधाऱ्यात मुलीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीची कसून चौकशी सुरु आहे.
24 May 2025 05:21 PM (IST)
पुणे-सोलापूर रस्त्यावर रवीदर्शन चौकात भरधाव टेम्पाेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे. पादचारी ज्येष्ठ महिलेचे विमलाबाई मथुराप्रसाद अगरवाल (वय ८२, रा. लोणावळा) असे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक विनोद भगवान गायकवाड (वय ४५, रा. लोणी काळभोर) याला अटक करण्यात आली. याबाबत मनोज अगरवाल (वय ३८, रा. लोणावळा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
24 May 2025 05:06 PM (IST)
खून, दरोडा, खंडणी या प्रकरणात राज्यात अव्वल असलेल्या बीड जिल्ह्यात आता विवाहित महिला देखील सुरक्षित नाहीत. यंदाच्या वर्षी म्हणजेच जानेवारी महिन्यापासून तर आतपर्यंत तब्बल 174 महिलांचा सासरी छळ झाल्याचे शासन दफ्तरी नोंद झाली आहे.
24 May 2025 04:39 PM (IST)
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता वैष्णवीचा पती, दीर, सासू-सासरा तसेच नणंद यांना अटक करण्यात आली आहे. 51 तोळे सोने फॉर्च्यूनर कार हुंडा म्हणून दिल्यानंतरही तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छळ काही थांबवला नाही. याच त्रासातून नंतर तिने स्वत:ला संपवलं. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेत लक्ष घातले असून लवकरच या प्रकरणात मी एक मोठा खुलासा करणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
24 May 2025 03:02 PM (IST)
पुणे शहरात हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. या प्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
24 May 2025 02:43 PM (IST)
एका तरुणाला चष्मा न घालणं चांगलंच महागात पडलंय. तरुणाने तब्ब्ल ९० हजार रुपये गमावले आहे. या प्रकरणी त्याने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सविस्तर बातमी
24 May 2025 02:42 PM (IST)
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा दगडाने ठेचुन खून केल्याची घटना घडली. ही घटना वडगाव मावळ येथील कोंडिवडे या गावात शुक्रवारी घडली. याबाबत मृत महिलेच्या वडिलांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अशोक बारकू वाघमारे (रा. कातकरी वस्ती, कोंडिवडे ता. मावळ) याला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे. सोनाबाई वाघमारे (३३) असे मृत महिलेचे नाव आहे.
24 May 2025 02:40 PM (IST)
किरकोळ स्वरुपाच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाचा चाकूने हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ असलेल्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. तसेच संशयिताकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.
24 May 2025 02:35 PM (IST)
तरुणाचं नाव अमूल्य शर्मा आहे. तो मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. तो मुंबईच्या वांद्रे येथे राहतो. अमूल्य हा एका लॉ फर्ममध्ये काम करतो आणि त्याला चष्म्याशिवाय दिसत नाही. चष्मा नसेल तर त्याला वाचताही येत नाही. मोबाईल वापरण्यासही अडचण येते. अमूल्य त्याच्या मित्रांनी ठेवलेल्या अंधेरीमध्ये एका पार्टीत चष्मा न घालता गेला होता. तो रिक्षाने गेला होता. रिक्षातून उतरल्यानंतर मोबाईलवरून पैसे द्यायचे होते. तेव्हा चालकाने मुळ्याची कमकुवत दृष्टी आणि विश्वासाचा फायदा घेत त्याच्या खात्यातून तब्ब्ल ९०,००० रुपये चोरले. या फसवणुकी प्रकरणात वांद्रे पोलिसांनी रिक्षाचालक फुरकान शेखविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
24 May 2025 01:16 PM (IST)
जंगली महाराज रस्त्यावरील एका नामांकित बिल्डरला ४६ लाखांहून अधिक रक्कम जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावून त्यास अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनिल दिलीप अरगडे (वय ३७, रा. महावीर नगर, माणिकबाग) यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपी धीरज दिनेशचंद्र उर्फ बाळासाहेब अरगडे (वय ३९, रा. मुळा रोड, खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल २०२४ ते दोन मे २०२५ या कालावधीत फोनवर व प्रत्यक्ष भेटीत घडली आहे.
24 May 2025 01:07 PM (IST)
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर बातमी
24 May 2025 12:27 PM (IST)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरत आहे. त्यात आदिवासी विकास विभागाच्या 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेवर वळता करण्यात आला. त्यामुळे राज्यभरातील आदिवासी समाजाच्या संघटना आणि विविध जमातींमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. वळता केलेला निधी पुन्हा आदिवासी विभागाला देण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.
24 May 2025 12:20 PM (IST)
पुणे शहरातील अवैध धंद्याविरोधात वारंवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार कठोर भूमिका घेत आहेत. विशेष करून हुक्काबार तसेच पब याबाबत विशेष लक्ष दिले जात असतानाच पोलीस उपनिरीक्षकाने हुक्का पार्लरला परवानगी देऊन त्याच्याकडून प्रोटेक्शन मनी घेतल्याचा प्रकार समोर आला असून, आयुक्तांनी या उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. त्यासोबतच अशा अवैध धंद्यांना सरंक्षण देऊन त्यांच्याकडून वसुली केल्यास तुमची खैर नाही, असेही सूचित केले आहे.
24 May 2025 12:00 PM (IST)
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणात तिच्या कुटूंबाची अद्याप कोणतीही तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली नाही. मात्र, आम्ही घटना घडल्यानंतर सुमोटो (स्वत: पुढाकार घेत) तक्रार दाखल केली. याप्रकरणी हगवणे कुटूंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. यासंदर्भात बावधान पोलीस चंगल्या पध्दतीने काम करत आहेत. यामुळे महिला आयोग गंभीर नाही ही टीका योग्य नसल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
24 May 2025 11:35 AM (IST)
राज्यभरातील प्रवाशांची फसवणूक करून आर्थिक लूट करणाऱ्या रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने गुरुवारी मलकापूर येथील पब्लिक रिझर्वेशन सेंटरवर (पीआरसी) कारवाई करत तब्बल १० लाख रुपयांहून अधिक किमतीची १८२ रेल्वे तिकिटे जप्त केली. या प्रकरणात संजय चांडक आणि प्रसाद नावाच्या दोन दलालांना अटक करण्यात आली असून, या दोघांचे संबंध मुंबईतील कुख्यात ‘ठाकूर गँग’ सोबत असल्याचे उघड झाले आहे.