तरुणाचं नाव अमूल्य शर्मा आहे. तो मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. तो मुंबईच्या वांद्रे येथे राहतो. अमूल्य हा एका लॉ फर्ममध्ये काम करतो आणि त्याला चष्म्याशिवाय दिसत नाही. चष्मा नसेल तर त्याला वाचताही येत नाही. मोबाईल वापरण्यासही अडचण येते. अमूल्य त्याच्या मित्रांनी ठेवलेल्या अंधेरीमध्ये एका पार्टीत चष्मा न घालता गेला होता. तो रिक्षाने गेला होता. रिक्षातून उतरल्यानंतर मोबाईलवरून पैसे द्यायचे होते. तेव्हा चालकाने मुळ्याची कमकुवत दृष्टी आणि विश्वासाचा फायदा घेत त्याच्या खात्यातून तब्ब्ल ९०,००० रुपये चोरले. या फसवणुकी प्रकरणात वांद्रे पोलिसांनी रिक्षाचालक फुरकान शेखविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Pune Police : हुक्का पार्लरकडून प्रोटेक्शन मनी घेणाऱ्या पोलिसाचे निलंबन
पार्टी संपल्यानंतर अमूल्य रिक्षाने वांद्रे येथील त्याच्या घरी निघाला. मुंबईत नवीन असल्याने त्याला रस्ता नीट माहित नव्हता, याचाच फायदा घेत रिक्षाचालक त्याला दुसऱ्या मार्गाने वांद्रे येथे घेऊन गेला. घरी पोहोचल्यावर रिक्षाचालकाने १५०० रुपये मागितले. अमूल्यने त्याला फक्त ५०० रुपये देईन असं सांगितलं. चष्मा विसरल्यामुळे अमूल्यला रक्कम दिसत नव्हती, रिक्षाचालकाचा मोबाईल नंबरही टाइप करता येत नव्हता. अश्या परिस्थितीत त्याने विश्वास ठेऊन तुपाचा मोबाईल रिक्षाचालकाला दिला जेणेकरून तो स्वतः ऑनलाइन व्यवहार करू शकेल. यावेळी मोबाईलमध्ये १५०० रुपयांऐवजी ९० हजार रुपये टाकले आणि अमूल्यला ओटीपी विचारला.ओटीपी (one time password) सांगताच फुरकान शेख नावाच्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यात आली.
काही वेळाने अमूल्यला संशय आला आणि जेव्हा त्याने बँक स्टेटमेंट तपासले तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला त्याला समजलं की, त्याच्या खात्यातून ९०,००० रुपये काढले गेले आहेत. त्याने लगेच वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फुरकान शेखविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
Vaishnavi Hagavane Case: वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचीही हेळसांड…; निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल