अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसले यांचे बंधू आणि माजी अभियंता संजय कौसले यांची हत्या करण्यात आली आहे.६० वर्षीय संजय कौसल हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंते म्हणून निवृत्त झाले होते. हा हत्याकांड अकोल्यातल्या रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडला आहे. आरोपीचं नाव महेंद्र पवार असं आहे. अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांनी पदभार घेताच पहिल्याच आठवड्यात हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
25 लाख पॅकज असून काढायची अश्लील व्हिडीओ, IIT पदवीधर तरुणीचा धक्कादायक कांड समोर
संजय कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार करत त्यांना जागीच ठार केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.पोलिसांनी तपास सुरु केला आहे. जुन्या वादातून हे हत्याकांड घडले असल्याची चर्चा सुरु आहे. पोलिसांनी आरोपी महेंद्र पवारला अटक केली आहे.
महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून तो एका प्रकरणात तुरुंगात गेला होता. सध्या तो जामीनावर बाहेर होता. संजय कौसल हे अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान बंधू आहेत. आरोपी महेंद्र पवार याची पार्श्वभूमी ही गुंड प्रवृत्तीची असून त्याने या आधीही एका व्यक्तीवर गंभीर हल्ला केला होता. त्या प्रकरणात तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. मारेकरी महेंद्र पवार आणि मृत संजय कौसल हे रणपिसे नगरमधील मुरलीधर टॉवरमध्ये राहतात. एका जुन्या वादातून ही हत्या झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली.नवे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अकोल्यात रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ही हत्या झाली आहे.
सायबर चोरट्यांचा नवा डाव; डिजीटल ॲरेस्टची भिती दाखवली अन्…
सायबर गुन्ह्यात ‘डिजीटल ॲरेस्ट’च्या भितीने अनेकांना गंडविले जात असतानाच पुणे पोलिसांच्या सायबर सेलने एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल सव्वा कोटींना गंडा घालणाऱ्या सायबर चोराला अटक करण्यात यश मिळविले आहे. या चोरट्याला पनवेलमधून पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून भारतातील पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.
तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८, रा. मु. पो. कोकबन, ता. रोह, जि. रायगड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत ७८ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस अंमलदार राजुदास चव्हाण व त्यांच्या पथकाने केली आहे.
मित्रानेच केला मित्राचा घात; धारदार शस्त्राने सपासप वार केले अन् नंतर…