File Photo : Crime
शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील एका कंपनीमध्ये एचआरकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अक्षय विजय काळे या तरूणासह त्याच्या सात साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील युकेबी कंपनीमध्ये काम करणाऱ्या अधिकराव पाटील याच्याबाबत अक्षय काळे काहीही अफवा पसरवत असल्याने पाटील हा त्याबाबत तक्रार करण्यासाठी एचआर याच्या केबिनमध्ये गेलेला होता. दरम्यान, एचआरसोबत चर्चा करत असताना अक्षय हा त्याच्या काही साथीदारांसह कंपनीच्या भिंतीवरुन अनाधिकाराने प्रवेश करुन एचआर यांच्या केबिनमध्ये आला.
दरम्यान, सर्वांनी अक्षयला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी काठीने मारहाण करत जखमी केले. याबाबत अधिकराव शिवाजीराव पाटील (वय २९ वर्षे रा. नक्षत्र सोसायटी वाघोली ता. हवेली जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
त्यानंतर पोलिसांनी अक्षय विजय काळे (रा. पिंपळसुटी इनामगाव ता. शिरुर जि. पुणे) सह सात अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय सरजिने हे करत आहे.