बीड जिल्ह्यातील परळी येथे एक संतापजनक आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. या रेल्वे स्थानकात एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, विशेषतः फाशीची शिक्षा मिळावी,या मागणीसाठी परळी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज परळी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.
Nanded News: नांदेडमध्ये भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू; उभ्या असलेल्या ट्रकला कारने दिली धडक
नेमकं काय घडलं?
पंढरपूर येथील एक जोडपे कामाच्या शोधात आपल्या पाच वर्षांच्या मुलीसोबत परळीत आले होते. रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर मुलीची आई आजारी असल्याने ती मुलीला घेऊन रेल्वे स्थानकात झोपली होती आणि वडील जवळच दुसरीकडे गेले होते. याच संधीचा फायदा घेत एका नराधमाने व्यक्तीच्या मुलीला उचलून नेले. तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर ही मुलगी रडत आपल्या आईकडे आली. त्यांनतर तिच्या आईने तिच्या गुप्तांगातून होणारा रक्तस्त्राव पहिला आणि त्यांनतर तिला हा अमानुष प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर चिमुकलीला तातडीने परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक वैधकीय तपासणीसाठी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा गांभीर्य तपास करून आरोपीला ताब्यता घेतले आहे.
आज सर्व परळीकर एकत्र आले आहेत. या मागणीसाठी आज सकाळी दहा वाजता राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून उपविभागीय कार्यालयावर एक मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राजकीय, सामाजिक, व्यापारी, डॉक्टर आणि मुस्लिम बांधवांसह सर्वच स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या घटनेमुळे परळी शहरात प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे. सध्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वत्र होत आहे.या आरोपीचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी आज सखल परळीकरांच्या वतीने परळी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
बीड पुन्हा हादरलं! मित्रानेच २५ वर्षीय मित्राला संपवलं
बीड: बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर वारंवार गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. कारण बीड जिल्ह्यातून वारंवार हत्या, अपहरण, लैंगिक अत्याचार, गावठी शास्त्रांचा वापर आणि किरकोळ कारणांवरून होणाऱ्या मारहाणीच्या घटना समोर येत आहे. आता एका तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा एकदा हादरले आहे. बीड शहरातील स्वराज्य नगर भागात चाकूने हल्ला करून एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मित्रानेच किरकोळ वाद झाला असून मित्रानेच धारदार शास्त्राने हत्या केली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून बड्या शिताफीने अवघ्या काही तासात अटक केली आहे..
Ratnagiri Crime: तिहेरी हत्याकांडाने रत्नागिरी हादरली! बारमध्येच रचले खुनाचे कट; सीरिअल किलर अटकेत