बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर वारंवार गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. कारण बीड जिल्ह्यातून वारंवार हत्या, अपहरण, लैंगिक अत्याचार, गावठी शास्त्रांचा वापर आणि किरकोळ कारणांवरून होणाऱ्या मारहाणीच्या घटना समोर येत आहे. आता एका तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा एकदा हादरले आहे. बीड शहरातील स्वराज्य नगर भागात चाकूने हल्ला करून एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मित्रानेच किरकोळ वाद झाला असून मित्रानेच धारदार शास्त्राने हत्या केली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून बड्या शिताफीने अवघ्या काही तासात अटक केली आहे.
Rajasthan crime : ‘ही क्रीम लाव, गोरी होशील’, फसवणूक करणाऱ्या पतीने पत्नीला जिवंत जाळले
नेमकं काय प्रकरण?
काल मध्यरात्री दोन वाजता विजय काळे हा गणपतीच्या समोर मित्रांसोबत नृत्य करत होता. त्याने त्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला होता. मात्र थोड्याच वेळात मित्र अभिषेक गायकवाड याच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर आरोपी अभिषेकने विजयच्या छातीत धारदार शास्त्राने वार केला. त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.
आरोपीला कसे केले अटक?
घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. एका डोंगराच्या परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करत बड्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे. मयत विजय काळे हा देखील गुन्हेगारी स्वरूपाचाच होता. त्याच्यावर बीडसह राज्यभरात अनेक पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
धक्कादायक ! मित्राला लोकेशन पाठवून तरुणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
मित्राला मोबाईलवर लोकेशन पाठवून एका 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. साहील साताप्पा जाधव (वय १९, सध्या रा. खडकेवाडा, ता. कागल, मूळ रा. वाघापूर, ता. भुदरगड) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. साहील जाधव याने कळंबा परिसरात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी (दि.3) सकाळी निदर्शनास आला.
साहील हा गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करत होता. हाताशी आलेल्या मुलाने आत्महत्या केल्याने जाधव कुटुंबीयांना धक्का बसला. करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहील जाधव हा आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून नुकताच गोकुळ शिरगाव येथील एका कंपनीत नोकरी करत होता. वडिलांचे निधन झाल्यामुळे घराची जबाबदारी त्याच्यावरच होती. आई आणि लहान भावासह तो खडकेवाडा येथे राहत होता. रविवारी सकाळी तो मित्राच्या दुचाकीवरून कामाला निघाला होता. मात्र, कळंबा येथे तो दुचाकीवरून उतरला. थोड्या वेळाने येतो, असे सांगून त्याने मित्राला पुढे पाठवले.
वाघापूर येथील एका मित्राच्या मोबाईलवर स्वतःचे लोकेशन पाठवून तो उसाच्या शेतातून एका आंब्याच्या झाडाजवळ गेला. दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी न आल्याने नातेवाईक आणि मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. रात्री उशिरा मित्राच्या मोबाईल लोकेशनवरून त्याचा शोध लागला. नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
Nanded News: नांदेडमध्ये भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू; उभ्या असलेल्या ट्रकला कारने दिली धडक