पुण्यात सदाशिव पेठ येथे १२ विध्यार्थ्यांना कार चालकाने उडवल्याची घटना घडली होती. कार चालक दारू पिऊन कार चालवत होता. आता या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोपी चालकाला काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होत. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात सर्व पुरावे न्यायालयाच्या समोर मांडले होते. आरोपीकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नव्हता असे असतांना त्यांने वाहन चालवण्याचे धाडस केले आणि यातून हा अपपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सेवानिवृत्त शिक्षिकेचा ‘डिजिटल अरेस्ट’; IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेऊन ८३ लाखांची फसवणूक
सर्व तांत्रिक पुराव्यांसह साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली आहे. दारूच्या नशेत जयराम मुळे याने काल चहा पिण्यासाठी थांबलेल्या १२ जणांना उडवले होते. यामध्ये विध्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
कशी घडली घटना?
पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना घडली. हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता. दारू पिऊन कार चालवणाऱ्या ड्रॉयव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. शनिवारी संध्याकाळी पुण्यातील भावे हायस्कूलजवळ ही घटना घडली. या अपघातात तीन जण गंभीर झाले तर नऊ विध्यार्थी किरकोळ जखमी तर सर्व जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
स्थानिक आमदार जखमीस्थळी उपस्थित
जखमींमध्ये तीन मुलींचाही समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार हेमंत रासणे उपस्थित राहिले. हेमंत रासणे यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली. या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यांचा जो काही खर्च असेल तो शासन करणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी साधला जखमींशी संवाद
यासोबतच अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विद्यार्थ्यांशी बातचीत करून दिली. जी मदत लागेल ती आम्ही करू असे अश्वशन देखील एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिल आहे.
अपघात परिसर अरुंद
अपघात जिथे झाला तो परिसर अरुंद रस्ते आणि छोटी गल्ली असलेला परिसर आहे. असं असतानाही कार चालक भरधाव वेगाने आला. त्यामुळे त्याचे करवरील नियंत्रण सुटलं आणि समोर चहा पीत असलेल्या विध्यार्थ्यांना त्याने उडवलं.
अकोल्यात भीषण अपघात; कार वाघाडी नदीच्या पुलावरून कोसळली, तिघांचा मृत्यू, 1 गंभीर






