File Photo : crime
मुंबई : बाहेर फिरण्यास आणि मोबाईल वापरावर आई निर्बंध टाकत असल्याने मुलीनेच आपल्या मानलेल्या भावाला सुपारी देत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना पनवेलमध्ये घडली. प्रिया नाईक असे मृत महिलेचे नाव असून, त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली.
हेदेखील वाचा : शर्यतच ठरली कारण ! वांद्रे-वरळी सी-लिंकवर BMW-Mercedes मध्ये भीषण अपघात; टॅक्सी आडवी येताच…
प्रिया यांची मुलगी प्रणिता ही विवाहित असून, मागील 2 वर्षांपासून पतीसोबत पटत नसल्याने ती आईकडेच राहत होती. यावेळी बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरावर आईने निर्बंध आणल्याने यातून सुटका मिळवण्यासाठी तिने आपल्या मानलेला भाऊ विवेक पाटील याला 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती. विवेकने आपला मित्र निशांतच्या मदतीने प्रिया यांची हत्या केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलीस तपासात विवेक आणि निशांतला ताब्यात घेतले असता ही धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी मुलगी प्रणिता, विवेक पाटील आणि निशांत पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास करण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : ‘रुमवर ये’ एअर फोर्सच्या अधिकारी महिलेला रात्री दोन वाजता फोन; रुमवर जाताच…
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता बाहेर फिरण्यास आणि मोबाईल वापरावर आई निर्बंध टाकत असल्याने मुलीनेच आपल्या मानलेल्या भावाला सुपारी देत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.