File Photo : Sea Link
मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर दोन आलिशान गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. बीएमडब्ल्यू आणि मर्सिडिज या दोन आलिशान गाड्यांमध्ये शर्यत लागली. या शर्यतीच्या नादात दोन गाड्यांनी एका टॅक्सीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कुटुंबातील चार सदस्य व टॅक्सीचालक जखमी झाला. या अपघातात मोठी वित्तहानी झाली.
हेदेखील वाचा : तब्बल 22 वर्षांनंतर खून प्रकरणातील आरोपी अखेर अटकेत; ‘असा’ अडकला जाळ्यात
वांद्रे-वरळी सी लिंकवर बीएमडब्ल्यू व मर्सिडीज या कारच्या चालकांनी शर्यत लावली होती. ही शर्यत इतकी भीषण होती की, दोघेही हायस्पीड गाड्या चालवत होते. काही अंतर पुढे गेल्यावर समोर एक टॅक्सी होती. त्याचवेळी या दोन्ही कारचालकांचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर या दोन्ही आलिशान गाड्या टॅक्सीला जाऊन धडकल्या. त्यानंतर कार पूलावरच उलटली. सुदैवाने टॅक्सीमधील प्रवासी वाचले. वरळी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही गाड्या जप्त केल्या. मर्सिडीज व बीएमडब्ल्यू चालकांना अटक केली.
दोन्ही कारचालकांनी लावली होती शर्यत…
बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी आपसात शर्यत लावली होती. दोघेही वांद्रे-वरळी सी लिंकवर सुसाट वेगाने कार चालवत होते. मात्र, दोघांचंही कारवरील नियंत्रण सुटलं व त्यांनी त्याच पूलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीला धडक दिली. दोन भरधाव गाड्यांच्या धडकेनंतर टॅक्सी उलटली. टॅक्सीमधील प्रवासी सुदैवाने वाचले.
कारचालकांविरोधात गुन्हा दाखल
या अपघातप्रकरणी दोन्ही आलिशान गाड्या चालवणाऱ्या चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टॅक्सीमधून लहान मुलासह एका कुटुंबातील चार सदस्य प्रवास करत होते. या अपघातात सुदैवाने त्यांचा जीव बचावला. मात्र, ते जखमी झाले आहेत.
हेदेखील वाचा : ‘रुमवर ये’ एअर फोर्सच्या अधिकारी महिलेला रात्री दोन वाजता फोन; रुमवर जाताच…