खळबळजनक ! जन्मदात्या मुलीवर बापानेच केला अत्याचार; एकदा नाहीतर... (फोटो सौजन्य: iStock)
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी संतापजनक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या पवित्र नात्याचा खून करत एका जन्मदात्या बापानेच आपल्या अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार केला. या कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून, करवीर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि तिची दोन लहान भावंडे कोल्हापूरच्या उपनगरात वास्तव्यास होती. भंगार गोळा करून आई मुलांचा सांभाळ करत होती. मात्र, दिवाळी तोंडावर असल्याचे कारण पुढे करून नराधम बापाने १३ वर्षांच्या मुलीला गावी नेले. यादरम्यान, बुधवारी (दि. २२) पहाटेच्या सुमारास आणि शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी साडेसातच्या या नराधमाने मुलीला धारदार शस्त्राचा धाक दाखवला आणि तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, या कृत्याची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही त्याने पीडित मुलीला दिली होती. अखेर मुलीने हा भयानक प्रकार आईला सांगितल्यावर, त्यांनी थेट करवीर पोलीस ठाणे गाठून नराधम पतीविरोधात तक्रार दाखल केली.
कोल्हापुरात संतापाचे वातावरण
या घटनेनंतर संपूर्ण करवीर तालुक्यासह कोल्हापूर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला संघटना आणि सामाजिक संस्थांनी या विकृत कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. या नराधम बापाला कठोर आणि तात्काळ शिक्षा व्हावी, तसेच अल्पवयीन मुलींसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन, पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
भिगवणमध्येही अत्याचाराची घटना समोर
राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच भिगवणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भिगवण परिसरातून पुण्याकडे जाण्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या महिलेला दुचाकीवर बसवून तिला झाडीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हेदेखील वाचा : बाप नव्हे तू राक्षस…., रोज रात्री स्वत:च्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, अत्यंत संतापजनक घटना समोर






