बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मांजरसुंबा-अंबाजोगाई राज्य महामार्गावरील एका हॉटेलबाहेर केवळ किरकोळ वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Crime News : टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात दगड घातला अन्…
नेमकं काय घडलं?
मांजरसुंबा-अंबाजोगाई राज्य महामार्गावर असलेल्या एका हॉटेलबाहेर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. अगदी किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या तरुणाचे नाव विजय केदार (रा. सांगवी, ता. केज) असे आहे. घटनेच्या वेळी विजय केदार महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेला होता. त्यावेळी त्याचा वेटरसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की हॉटेल मालकाने देखील यात हस्तक्षेप करत विजयवर हल्ला चढवला. हल्ल्यात वेटर आणि हॉटेल मालक दोघांनी मिळून विजयला बेदम मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आधी दोघांमध्ये आधी वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्र आणि लाकडी वस्तूंनी बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तरुणाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंदविला गेलेला नाही आहे. तरुणाच्या तक्रारीनुसार लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची भावना आहे. महामार्गावरील हॉटेलमध्ये अशा घटना घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बीडमध्ये शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला, मध्यरात्री मदत मागण्याच्या बहाण्याने त्यांना घराबाहेर बोलावलं आणि…
बीड जिल्ह्यातील शहरालगत असलेल्या पालवान गावात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शिवसेनेच्या एका नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री मदत मागण्याच्या बहाण्याने त्यांना घराबाहेर बोलावण्यात आले आणि मग दबा धरून असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिवसेनेच्या वैधकीय मदत कक्षाचे बीड समन्वयक विलास भारत मस्के (वय ३२) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर्थिक व्यवहारातून व्यावसायिक भागीदारानेच हा हल्ला घडवून आणल्याचा संशय म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
Nashik Crime:नाशिकमध्ये लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, अल्पवयीन मुलगी गर्भवती