खळबळजनक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून; पोटच्या दोन मुलांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न
राज्यात गुन्हेगारीचा सत्र वाढत चालला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, शास्त्राचा धाक दाखवून होणारी मारहाण, दरोडे लैंगिक अत्याचार अश्या घटना जिल्ह्यातून वारंवार समोर येत आहे. आता शिरूर तालुक्यातील मानूर जवळील तुपे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोराने सशस्त्र दरोडा टाकत पती पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भगवान तुपे यांच्या घरी घडली आहे. आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावत भगवान तुपे यांच्या घराचे दार तोंडूनच प्रवेश केला. आणि त्यानंतर जे घडलं ते खूप धक्कादायक घडलं.
महिन्याभरापूर्वी झालं होत लग्न, नवदाम्पत्याचे बाथरूममध्ये आढळले मृतदेह; काय घडलं नेमकं?
नेमकं काय घडलं?
बीडच्या शिरूर तालुक्यातील मानूर जवळील हनुमानवाडी येथील तुपे वस्तीवर मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान दरोडेखोराने सशस्त्र दरोडा टाकला. मध्यरात्री तीन चोरांनी तुपे वस्तीवरील आजुबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून भागवत तुपे यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला. आणि पती पत्नीला बेदम मारहाण करून लूटमार केली. या वेळी भागवत तुपे यांच्या पत्नी सरस्वती यांचे तोंड दाबून गळ्यातील मंगळसूत्र काढले. तसेच बाजूला झोपलेले पती भागवत तुपे जागे झाल्याने त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून डोके फोडले. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरोडेखोर सरस्वती तुपे यांच्या पाकिटातील रोख दहा हजार रुपये आणि गळ्यातील तसेच घरात ठेवलेले दोन तोळ्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. या संपूर्ण घटनेने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे .
बीड पुन्हा हादरलं ! ‘तुझा संतोष देशमुख करतो…’, म्हणत तरुणावर कोयत्याने वार
शेतीमधील बांधाच्या वादावरून तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. ‘तुझा संतोष देशमुख करतो…’, अशी धमकीही देण्यात आली. कैलास सांगुळे असं जखमी तरूणाचं नाव आहे. तो बीड तालुक्यातील तांदळवाडी भिल्ल येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. काही कामानिमित्त कैलास त्याच्या दुचाकीने निघाला होता. त्यावेळी चार जणांनी त्याची वाट अडवली. या चौघांनी कैलास याच्यावर कोयत्याने डोक्यावर, मानेवर आणि तोंडावर जबरदस्त हल्ला केला. तसेच हल्लेखोरांनी ‘तुझा संतोष देशमुख करतो, याला जीवे मारा’ अशी धमकीही दिली. या हल्ल्यानंतर तरुण जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, शरीरावर 100 हून अधिक गंभीर वार असल्याची माहिती आहे. तरुणाच्या डोकं आणि मानेतून रक्ताच्या धारा वाहत होत्या. तरूणाची स्थिती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इतक्या गंभीर हल्ल्यानंतरही बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
कोथरूडच्या वेदभवनजवळ विचित्र अपघात; बसचा चालक अडकला अन्…