काय घडलं नेमकं?
मृतकाचे नाव उर्मिला असे आहे. उर्मिला आणि तिचा पती हे मूळ नेपाळचे रहिवासी असून पैसे कमवण्यासाठी गुजरातमध्ये राहत होते. ती तिच्या पतीसोबत मिळून चायनीज पदार्थांचा बिझनेस करत होती. पीडितेने काही दिवसांपूर्वी तिच्या पतीकडे नव्या मोबाईल फोनची मागणी केली. मात्र, त्यावेळी पतीने घरात आर्थिक अडचणी असल्याचे कारण सांगून पत्नीला नवा मोबाईल फोन घेऊन देण्यास नकार दिला. यावरून उर्मिला आणि तिच्या पतीमध्ये जोरदार वाद झाला. याच वादाला कंटाळून महिलेने आपल्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांना संबंधित घटनेची माहिती देण्यात आली. प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आता, पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
‘अपघात’ म्हणत केले अंत्यसंस्कार; पण पोस्टमॉर्टमनंतर घडलं भलतंच, खून नक्की केला कोणी? नेमकं प्रकरण काय
गुजरात येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय व्यक्तीची निर्दयी हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला मृत्यू अपघात वाटले म्हणून अत्न्त्यसंस्कार देखील करण्यात आला. परंतु त्याच्या पत्नीच्या विचित्र वागण्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमार्टमनंतर धक्कदायक प्रकरण समोर आलं.
ही घटना गुजरातमधील वडोदरा येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव इरशाद अब्दुल करीम बंजारा असे आहे.पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये इर्शादचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नाही तर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही एक सुनियोजित हत्या होती. हे समोर येताच पोलिसांनी तातडीने कारवाई करायला सुरुवात केली. मृतकाची पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणी आता अधिक तपास करत आहे.
Ans: गुजरातच्या मोडासा येथे.
Ans: नव्या मोबाईलच्या मागणीवरून झालेला वाद आणि आर्थिक अडचणी.
Ans: मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवून आकस्मिक मृत्यूची नोंद; तपास सुरू.






