मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा आला राग; अल्पवयीन मुलावर चाकूने वार केला अन्...
कराड : शहरातील मुजावर कॉलनीत मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर चाकूने वार करण्यात आले. मंगळवारी रात्री ही घटना घडली. फैजान फैयाज बारगीर (वय 15, रा. दौलत कॉलनी, कराड) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शहाबाद उर्फ छोटा इस्माईल पठाण (वय 30, रा. मुजावर कॉलनी, कराड) याच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील दौलत कॉलनीत राहणार्या फैजान बारगीर या अल्पवयीन मुलाला मुजावर कॉलनीतील शहाबाद उर्फ छोटा पठाण आणि अन्य एका मुलाने चौकात बोलावले. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फैजान हा घरात असताना मुजावर कॉलनीतील संबंधित अल्पवयीन मुलाने त्याच्या इन्स्टाग्रामवर शिवीगाळीचे मेसेज पाठवून ‘तू चौकात ये तुला दाखवतो’, असा मेसेज केला. तसेच फोन करून मुजावर कॉलनीतील चौकात येण्यास सांगितले.
हेदेखील वाचा : Latur Crime : व्याजाच्या वादातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद
त्यानुसार, फैजान हा चौकात गेला असता संबंधित अल्पवयीन मुलाने त्याच्याकडे एका मुलीचा इन्स्टाग्राम आयडी मागितला. मात्र, फैजान याने आयडी देण्यास नकार दिला. त्यावेळी चिडून जाऊन संशयित अल्पवयीन मुलगा तसेच शहाबाद उर्फ छोटा पठाण या दोघांनी फैजान याच्या डोक्यात, छातीवर, पाठीवर तसेच डाव्या हातावर चाकूने वार केले. त्यामध्ये फैजान जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
व्याजाच्या पैशांसाठी तरुणावर हल्ला
व्याजासह पैसे परत करून देखील अतिरिक्त व्याजाची मागणी पूर्ण न केल्याने एका तरुणावर तलवार, काठी आणि दगडांनी हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे. ही घटना लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नाईक चौकात घडली.






