गुटखा-पान मसाला प्रकरणात शाहरुख खानसह सेलिब्रिटींवर कारवाईची मागणी
Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू
पांडे यांच्या मते महाराष्ट्रात सातत्याने गुटखा, पान मसाला आणि सुगंधी सुपारीची मोठ्या प्रमाणावर जप्ती होत असतानाही गुन्हे प्रामुख्याने किरकोळ विक्रेते, वितरक किंवा वाहतूकदारांपुरते मर्यादित राहतात. मात्र या अवैध व्यापारातून आर्थिक लाभ घेणारे उत्पादक, बँड मालक, वित्तपुरवठादार आणि मार्केटिंग यंत्रणा अनेकदा चौकशीच्या कक्षेबाहेर राहत असल्याचे पांडे म्हणाले. तसेच शाहरुख खानसह विविध सेलिब्रिटींच्या पान मसाला बँडशी संबंधित जाहिरातींचा उल्लेख करत, अशा प्रचारामुळे विशेषतः तरुणांमध्ये या बँडची ओळख आणि आकर्षण वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘मकोका’ लागू करण्याचा विचार करण्याची विनंती
‘इलायची’, ‘माउथ फ्रेशनर’ किंवा तत्सम उत्पादनांच्या नावाखाली होणारी सरोगेट जाहिरात ही सार्वजनिक आरोग्यविषयक कायद्यांना चकवा देण्याची पद्धत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये आवश्यकतेनुसार मकोका लागू करण्याचा विचार करावा, तसेच सरोगेट जाहिरातींसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेडमार्क आणि बैंड नोंदणी रद्द किंवा निलंबित करण्यासाठी संबंधित यंत्रणांना शिफारस करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पान-विडी दुकानांवर महानगरपालिकेचे छापे
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरभर केलेल्या कारवाईनंतर, मुंबई महानगरपालिकेनेही कारवाईला सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते २३ जुलै दरम्यान, एकट्या ‘ए’ वॉर्डमध्ये महापालिकेच्या परवाना विभागाने १२३ पान-बिडी दुकानांवर छापे टाकून सुमारे २५ लाख रुपयांचा अनधिकृत माल जप्त केला. जप्त केलेल्या मालामध्ये सिगारेट, गुटखा (तंबाखू) आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश होता.
महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापति सचिन अहीरेंच्या घरी २,६५ कोटींची चोरी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
गुरुवारी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) बाहेरील अनधिकृत पान आणि सिगारेटच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. यावेळी अनधिकृत विक्रेत्यांकडून सुमारे १.५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई डॉ. दादाभाई नवरोजी रोड, पी. डीमेलो रोड आणि मुर्झबान रोडवर करण्यात आली. यातील स्टॉल्सना परवानगी होती, परंतु त्यांच्याकडे सिगारेट विकण्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. सिगारेट आणि तंबाखूयुक्त पदार्थांच्या विक्रीसाठी दुकानांना वेगळा ‘पान-विडी’ परवाना दिला जातो. असा परवाना नसलेल्या दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






