काय घडलं नेमकं?
घडलेली घडताना २१ जुलै रोजी आंबेठाण येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव अश्विनी पाटील असे आहे. अश्विनी पाटील यांना त्वचेचा त्रास होऊन त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात फोड आले होते. ही बाब अश्विनीने आपल्या पतीला संदीप पाटील यांना सांगितली. त्यांनी दवाखान्यात जाण्याबाबतही सांगितले होते. मात्र २१ जुलैला सायंकाळच्या सुमारास संदीप पाटील हे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरून परत आल्यांनतर घरचा दरवाजा आतून बंद होता. संदीप पाटील यांनी वारंवार हाका मारल्या मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक रहिवाशांनी ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तेव्हा स्लॅबच्या लोखंडी हुकला दोरी बांधून अश्विनीने गळफास घेत आत्महत्या केली. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
धक्कादायक ! आई आणि मुलाने केली आत्महत्या; विष प्राशन करून संपवलं जीवन
पोलीस तपास सुरु
चेहऱ्यावर फोड आल्याने अश्विनी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तिने याच कारणातून आत्महत्या केल्याचे पतीने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरु आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न; पोलीस चौकीजवळच…
पुण्यात गुन्हेगारी असून, वेगवेगळ्या भागात सतत खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता आज भरदिवसा एक खळबळजनक घटना घडली आहे. घोरपडे पेठ परिसरातील पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. नूर असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Kalyan Crime: 16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड
Ans: पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात.
Ans: चेहऱ्यावरील पिंपल्स आणि त्वचेच्या त्रासामुळे.
Ans: आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास करत आहेत.






